शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये नाविन्यपूर्ण पुस्तक हंडी 

By अनिकेत घमंडी | Updated: September 7, 2023 12:24 IST

इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी "श्रीकृष्ण व सुदामा भेट"ही छोटीशी नाटिका सादर केली.

डोंबिवली:  राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेत गोपाळकाला निमित्त "पुस्तक हंडी" साकारण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या नाविन्यपूर्ण उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुलभा बोंडे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रसिका फडके,संस्था सदस्य माधवी कुलकर्णी, बोंडे व पर्यवेक्षिका जयश्री दौंड या उपस्थित होत्या.          यावेळी इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी "श्रीकृष्ण व सुदामा भेट"ही छोटीशी नाटिका सादर केली. यामध्ये श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीपूर्ण भेटीचे वर्णन करण्यात आले. त्यानंतर "पुस्तक हंडी" साकारण्यात आली. "पुस्तक हंडीत" पुस्तकांच्या नावांच्या चिठ्ठ्या तसेच काही शालेय उपयोगी वस्तू जसे की पेन,खोडरबर,पेन्सिल, स्केचपेन ठेवण्यात आले होते. सर्वप्रथम मुलांनी व मुलींनी पुस्तक हंडीला थर लावून सलामी दिली. त्यानंतर पुन्हा थर लावण्यात आले व त्यावर श्रीकृष्णाने चढून पुस्तक हंडी फोडली.

पुस्तक हंडी फोडल्यानंतर खाली बसलेल्या मुलांनी एक- एक चिठ्ठी व उपयोगी वस्तू गोळा केल्या. त्या चिठ्ठीत नाव असणारे पुस्तक पाहुण्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्याला एक महिना वाचण्यासाठी देण्यात आले आणि महिन्यानंतर  पुन्हा दुसरे पुस्तक बदलून देण्यात येईल. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रसिका फडके यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. व आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

श्रीकृष्ण व सुदामा भेट ही नाटिका बसवून घेण्याचं काम पल्लवी गवळी आणि अनंता खरपडे यांनी केले. विद्यार्थ्यांची वेशभूषा  मोनिका पाटील व संदेश गवारी यांनी करून घेतली. विद्यार्थ्यांचा सराव दिलीप दळवी व गोविंद राठोड तसेच विद्यार्थिनींचा सराव शशिकला कांबळे व कुमुदिनी नेमाडे यांनी करून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी उर्वी गोडबोले हीने तर आभार मधुरा शिंदे हिने मानले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली