शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोपर उड्डाणपुलाच्या कामात किती जागा जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:49 IST

केडीएमसीने स्पष्ट करावे : माजी नगरसेवक, रहिवाशांचे साखळी उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कडाेंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू असून, त्या कामात पुलालगतच्या रहिवाशांची जागा बाधित होणार आहे. मात्र, नेमकी किती जाणार, याचे स्पष्टीकरण केडीएमसीचा एकही अधिकारी देत नाही. त्यामुळे त्याविरोधात माजी नगरसेवक मंदार हळबे हे परिसरातील रहिवाशांसमवेत साखळी उपोषणाला बसले आहेत.यासंदर्भात हळबे म्हणाले की, ‘उड्डाणपुलाच्या कामाला अजिबात विरोध नाही. या पुलाचे काम पत्रीपुलाप्रमाणे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे पुलासाठी तयार होणाऱ्या रस्त्यासाठी तेथील रहिवाशांची जागा बाधित आहे. याबाबत संबंधित ४८ जणांना मनपाने नोटीस दिली आहे. त्याबाबत सुनावणी झाली होती. मात्र, नेमकी कोणाची कोणत्या दिशेकडील किती जागा जाणार आहे, त्या जागेच्या मोबदल्यात ज्यांची घरे जातील, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? असे प्रश्न अनुत्तरित आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘मनपाचे पथक मंगळवारी सनशाईन इमारतीचे कंपाउंड तोडण्याच्या तयारीत आले होते. त्यामुळे रहिवाशांमध्ये दडपणाचे वातावरण आहे. ते सहन केले जाणार नाही. मनपाने बाधित जागेच्या बदल्यात काय भरपाई देणार हे जाहीर करावे. त्यानंतर कामाला सुरुवात करावी. आम्ही नेहमीच मनपाला सहकार्य करत आलो आहोत. मध्यरात्रीही १२ ते ६ या वेळेत काम करण्यासाठी रहिवासी एकत्र येऊन सहमती दिली होती, म्हणून जे काम आता दिसते आहे, ते झाले आहे, अन्यथा पुलाच्या कामाला आणखी दिरंगाई झाली असती.’दरम्यान, हळबे यांनी आंदोलन करू नये, कोरोनाकाळात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, ते गरजेचे असल्याचे कारण दाखवत बुधवारी त्यांना नोटीस बजावली होती; पण जनतेसाठी कोरोनाच्या नियमांची काळजी घेऊन साखळी उपोषण केले जाईल, असे उत्तर त्यांनी त्यावर दिले होते. दुपारी चार वाजेपर्यंत उपोषणकर्त्यांशी चर्चा करायला कोणीही आले नसल्याचे हळबे म्हणाले.

कोपर उड्डाणपुलाच्या कामामुळे कोणीही बेघर झालेले नाही. तेथील रहिवाशांना दिलेल्या नोटिशीनुसार त्यांची १८ डिसेंबरला सुनावणी घेतली होती. त्याला मंदार हळबे राहात असलेल्या सोसायटीचे सचिव उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पुलाच्या कामासाठी पूर्ण सहकार्य असेल, असे जाहीर केले होते. तसेच तेथील एका हॉटेलचे संचालक नितीन पाटील यांनाही पुलाच्या कामात अडथळा येणारी भिंत तोडण्यासंदर्भात सूचित केले होते, त्यांनी त्याप्रमाणे समान हलवून सहकार्य केले.     - स्नेहा करपे, ग प्रभागक्षेत्र अधिकारी 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका