शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयूपी घरांचा ताबा फेब्रुवारीअखेर द्या; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:47 IST

उंबर्डे येथील प्रकल्पाची केली पाहणी

कल्याण : केंद्र सरकारच्या बीएसयूपी प्रकल्पांतर्गत शहरी गरिबांसाठी कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे उभारण्यात येणाऱ्या दीड हजारपैकी ७०० घरांचा ताबा फेब्रुवारीअखेरपर्यंत द्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.बुधवारी त्यांनी विविध प्रकल्पांच्या पाहणीअंतर्गत उंबर्डे व बारावे येथील बीएसयूपी प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी महापालिकेच्या गृहनिर्माण प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी, जगदीश कोरे, भालचंद्र नेमाडे, परिवन व्यवस्थापक मिलिंद धाट उपस्थित होते. आयुक्तांनी सांगितले की, उंबर्डे येथे बीएसयूपी प्रकल्पांतर्गत दीड हजार घरे तयार होत आहेत. त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ७०० घरांचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करून त्याचा ताबा लाभार्थींना द्यावा. त्याचबरोबर बारावे येथे एक हजार २४३ घरे तयार होत आहेत. त्याचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. सीएनजी पंपास निधीची कमतरता नाहीवालधुनी नदीच्या संरक्षक भिंतीसह बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करून तो फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यास सांगितले. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास संरक्षक भिंत नसल्याने पाणी आगारात शिरते, याकडे लक्ष वेधले. प्रस्तावित सीएनसी पंपाच्या जागेची पाहणीही आयुक्तांनी केली. निधीची कमतरता असल्याने सगळी कामे करणे शक्य नसल्याने अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता दिली जाईल, अशी हमी दिली.विद्युतीकरणाचे काम मार्चपर्यंतबीएसयुपीच्या घरातील विद्युतीकरण व लिफ्टचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना आयुक्तांनी केल्या. यानंतर त्यांनी गणेश घाट येथील परिवहन कार्यशाळेस भेट देऊन बस स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वॉशिंग रॅम्पची पाहणी केली. कोरोना काळात बस दररोज स्वच्छ झाल्या पाहिजेत याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका