शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या गणेश मूर्ती; जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन

By अनिकेत घमंडी | Updated: August 22, 2022 14:34 IST

राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

डोंबिवली:  'जलप्रदूषण दूर करू मातीचे गणपती बनवू', या स्लोगन अंतर्गत जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. 

शाळेचे माजी विद्यार्थी अर्जुन भाबल यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे सदस्य मंदार कुलकर्णी, इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट शुभांगी काळे, सेक्रेटरी नीलम नागडा, खजिनदार लक्ष्मी चैनी , पर्यावरण दक्षता मंचच्या रुपाली शाईवाले,यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक मातीपासून गणपती मूर्ती मोफत बनविण्याची संधी त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. यावेळी 'या कार्यशाळेत सातवी ते दहावीच्या ऐंशी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला व अत्यंत सुबक अशा विविध आकारातील गणेश मूर्ती बनविल्या. 

गणेशमूर्ती बनविण्याचीअगदी सोपी पद्धत तसेच मूर्तीच्या चेहऱ्यावर जिवंत हावभाव कसे साकारावेत, हे प्रसिद्ध मूर्तिकार गुणेशजी अडवळ, शिल्पकार सोहम अडवळ, भार्गवी अडवळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. त्याचबरोबर या मातीची वैशिष्ट्ये सांगितले.ती वाळल्यावर कुटून पुन्हा पुन्हा वापरता येते.त्यापासून ॲम्बाॅसिंग, म्यूरल, मास्क, पाॅटमेकिंग नागपंचमीसाठी नाग, बैलपोळ्यासाठी बैल, दिवाळीसाठी विविध आकारातील किल्ले बनविता येतील असे सांगितले. 

पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून जर प्रदूषण कसे होते हे पटवून दिले. मुलांबरोबर कला शिक्षिका मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांनी देखील सुबक गणेश मूर्ती बनवली. विद्यार्थ्यासाठी करियरच्या नव्या वाटा यासाठी सातवे पुष्प गुंफले गेले. यासाठी शाळेचे उत्साही क्रीडा शिक्षक लजपत जाधव,कला शिक्षक धांगडा, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे गणेश पाटील, राम वनघरे, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उत्तम गणेश मूर्ती साकारणाऱ्यां विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या प्रोत्साहनामुळे घेतलेल्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून खूप खूप कौतुक करण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीGanesh Mahotsavगणेशोत्सव