शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही; कल्याण पुर्वेतील कचोरे टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 14:13 IST

संरक्षक जाळीची मागणी करूनही  प्रशासनांच दुर्लक्ष,  लोकप्रतिनिधीचा आरोप 

केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एनडीआरएफच्या टिमसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती व नेतीवली क कचोरे टेकडीची पाहणी  केली.  पाहणी झाली मात्र आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीवर आजही नागरिक भीतीच्या  छायेखाली रहात आहे. या परिसरात एका ठिकाणी दगड पडू नये म्हणून संरक्षक जाळीसाठी पोल उभे करण्यात आलेय. मात्र या  ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाळी  दिसून येत नाही. गेल्या अनेक  वर्षांपासून संरक्षक जाळी बसवण्याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय पण याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप स्थानिक  नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला आहे.

डोंगराच्या अगदी तोंडाशी काही घर आहेत. अनेकदा लहान मोठे दगड या ठिकाणी पडतात. मात्र जीव मुठीत घेऊन  आम्ही रहातो अस येथील नागरिक सांगतात.अनेकदा या ठिकाणी दुर्घटना देखील घडल्यात. आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे असं येथील नागरिक सांगतात. मात्र  घराच्या तोंडाशी असलेला  हा उंच  डोंगर पाहून तुमच्या मनात सुद्धा धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. 

 मागच्या वर्षी या घरावर  दरड कोसळून संपूर्ण घराचा चक्काचूर झाला होता.अतिवृष्टी झाली तर पुन्हा या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत आम्ही संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना विचारल असता त्यांनी सांगितलं की नुकताच एनडीआरएफच्या  टीम सोबत केडीएमसी आयुक्तांनी या टेकडीची पाहणी केलीय. येथील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात.

अतिवृष्टीच्या काळात केडीएमसीनं या लोकांची पर्यायी व्यवस्था केलीये मात्र लोक येथून हालायला मागत नाही, अस त्यांनी सांगितलं. तसेच  या ठिकणी उपाय योजना करण्याबाबत विचार सुरू असल्याच अभियंता सुभाष पाटील यांनी सांगितलं.  आता प्रशासन , कचोरे येथील रहिवासी आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी एकत्र येत यावर योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे