शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:20 IST

केडीएमसीची पथके तैनात; कारवाईच्या धास्तीने फेरीवाल्यांची पाठ

डाेंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुभाव टाळण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १ एप्रिलच्या सुधारित आदेशानुसार शनिवार व रविवारी फेरीवाल्यांना व्यवसायास मनाई केली आहे. त्यानुसार शनिवारी फेरीवाले बसू नयेत, यासाठी पूर्वेतील ‘ग’ व ‘फ’ आणि पश्चिमेतील ‘ह’ प्रभागांत केडीएमसीने सकाळी ७ वाजल्यापासून भरारी पथके तैनात केली होती. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि फडके रोड, चिमणी गल्लीतील भाजीमार्केट परिसरात शुकशुकाट होता. मात्र, काही भागांत फेरीवाले सकाळी तसेच सायंकाळी बसलेले आढळून आले. आयुक्तांनी होळीच्या अगोदर काढलेल्या आदेशानुसार फेरीवाले आणि दुकानदारांना शनिवार आणि रविवारी व्यवसाय करण्यास मनाई केली होती. मात्र, होळीच्या आदल्या दिवशी दुकानदारांनी डोंबिवलीतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयाबाहेर आयुक्तांच्या आदेशाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांना आपला निर्णय बदलावा लागला होता. त्यामुळे दुकानदारांना शनिवार व रविवारी व्यवसाय करण्यास मुभा, मग आमच्या बाबतीत दुजाभाव का, अशी संतप्त प्रतिक्रिया फेरीवाल्यांमध्ये उमटत आहे. मनपा प्रशासनाने निर्णय न बदलल्यास फेरीवाल्यांच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता फेरीवाले बसू नयेत, यासाठी मनपाने सकाळीच भरारी पथके तैनात केली होती. त्याची धास्ती घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय करणे टाळले. मात्र, काहींनी बसण्याचा प्रयत्न केला असता मनपाच्या पथकांनी त्यांना कारवाईची तंबी दिली. त्यामुळे फेरीवाल्यांनीही काढता पाय घेतला. ‘ग’ प्रभागात रमाकांत जोशी यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी रामनगर, एस. व्ही. पथ, शिवमंदिर रोड, पाटकर रोड, डॉ. राथ रस्ता, उर्सेकरवाडी तर, पश्चिमेत ‘ह’ प्रभागात बाजीराव आहेर यांनी दीनदयाळ, घनश्याम गुप्ते रोड, महात्मा फुले रोड आणि सुभाष रोड येथे कर्मचारी तैनात केले होते. ‘फ’ प्रभागात फडके रोड, मानपाडा  रोड, टाटा पॉवर लेन, स्काय वॉक आदी ठिकाणी फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. दुसरीकडे नागरिकांनी ११ वाजल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात येण्याचे टाळल्याने तेथे गर्दी आटोक्यात असल्याचे निदर्शनास आले. काही भागांत मात्र फेरीवाल्यांचे बस्तान पूर्वेत गोग्रासवाडी, मानपाडा रोड, सुनीलनगर, दत्तानगर, नेहरू मैदान, ठाकुर्ली येथे भाजीपाला व फळविक्रेते व्यवसाय करताना आढळले. सायंकाळच्या वेळी फडके रोड, छेडा रोडे येथे फेरीवाले, हातगाडीवाले व्यवसाय करत होते.  पश्चिमेत गुप्ते रोड, नवापडा, उमेशनगर येथेही काही प्रमाणात फेरीवाले, रस्त्यावर चीजवस्तू विक्री करणारे आढळून आले. मात्र, कारवाईच्या भीतीने पथारी आवरून सावधगिरी बाळगून काहींनी छुप्या पद्धतीने मालाची विक्री केली.  काही ठिकाणी मनपाच्या पथकाची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आयुक्तांनी दुकानदारांना शनिवार, रविवारी व्यवसाय करण्यास मुभा दिल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण होते.