शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाचे मंगळसूत्र चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:44 IST

वारंवार घटना : कोविड केंद्रे असुरक्षित

डोंबिवली : केडीएमसीची कोविड केंद्रे असुरक्षित असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. पूर्वेतील जिमखाना कोविड केंद्रातील एका महिला रुग्णाच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अनोळखी व्यक्तीने लांबविल्याची घटना १ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी सोमवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.१ डिसेंबरला रात्री १० वाजता रुग्ण महिलेस रेमडेसीवीर इंजेक्शन दिले. त्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. २ डिसेंबरला सकाळी ९ वाजता त्यांना जाग आल्यावर गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. या चोरीप्रकरणी रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णाचे दागिने लंपास झाल्याची सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.जुलैमध्ये केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मृत्यू झालेल्या ५५ वर्षीय कोरोना रुग्णाची दीड तोळ्याची चेन चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासन, तसेच माजी महापौर व नगरसेवक रमेश जाधव यांच्याकडेही केली होती, तर ऑक्टोबरमध्येही गोविंदवाडी परिसरातील आसरा कोविड उपचार केंद्रात ६५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचे सोन्याचे दागिने व रोकड, असा ९७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी त्या महिलेच्या मुलाने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता, तर आता तिसरी चोरीची घटना घडल्याने कोविड केंद्रांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या संदर्भात केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.