शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्या 2700, मात्र अधिकारी केवळ तीनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:48 IST

तीन पदे मंजुरीच्या प्रतीक्षेत : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयावर वाढला ताण

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयांतर्गत दोन हजार ७०० कंपन्या येत असून, त्यांच्या पाहणीसाठी केवळ तीन अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. सरकारकडे आणखी तीन उपसंचालक वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ती मंजूर झालेली नाहीत.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याणच्या कार्यालयांतर्गत कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी हे सहा तालुके येतात. तेथे दोन हजार ७०० कंपन्या आहेत. त्या तुलनेत या कार्यालयात एक सहसंचालक व तीन उपसंचालक आहेत. उपसंचालकांना प्रत्यक्ष घटनास्थळी वा कंपनीत जाऊन पाहणी करावी लागते. मात्र, हा परिसर मोठा असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.कल्याण, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यांतील कंपन्यांमध्ये नेहमी दुर्घटना घडतात. डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक कंपन्या व कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मागील काही वर्षांत या कंपन्यांमध्ये आग, स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या तपासणीसाठी तीन उपसंचालकांची गरज आहे. मात्र, ते उपलब्ध करून दिले जात नाहीत. प्रोबेस कंपनीच्या स्फोटानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात अधिकारी कमी असल्याची बाब उघड झाली होती.

तपासणी करण्यावर मर्यादा२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्पेक्टर राज संपविण्यासाठी सुलभ व्यावसायिकीकरणाचे धोरण जाहीर केले. त्याची अंमलबजावणी २०१७ मध्ये सुरू झाली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यास सरकारच्या मुख्यालयातून कोणत्या कंपन्यांची तपासणी करायची आहे, याची यादी पुरविली जाते. त्यानंतरच अधिकारी कंपनीची पाहणी करू शकतो. एखाद्या कंपनीत गैर प्रकार सुरू असला तरी यादीत त्या कंपनीचे नाव नसेल तर तेथे तपासणी करण्यावर मर्यादा येतात, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीkalyanकल्याण