शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

‘पंतप्रधान आवास’साठी उंबार्ली टेकडीवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:24 IST

‘म्हाडा’तर्फे काम सुरू : ५ जानेवारीला मनसेची आंदोलनाची हाक, पर्यावरणाचा ऱ्हास

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण  : पर्यावरणाने समृद्ध असलेली डोंबिवलीजवळील उंबार्ली टेकडी पोखरून तेथे ‘म्हाडा’तर्फे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधण्यात येत आहेत. निसर्गाला हानी पोहोचवून काँक्रिटचे जंगल उभारण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी मनसेने करीत ५ जानेवारीला तेथे आंदोलनाची हाक दिली आहे.

मनसेचे राजेश कदम म्हणाले, उंबार्ली टेकडीवर वनविभाग, भूमिपूत्र, पक्षी व निसर्गप्रेमींनी ४० हजार वृक्षांची लागवड केली आहे. या टेकडीवर नागरिक फिरायला येतात. वनप्रेमी तेथे झाडांना पाणी घालतात. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या टेकडीवरील वनराईचे जतन करण्याबरोबर तेथे नाशिकच्या धर्तीवर बॉटीनिकल गार्डन उभारण्याचा मानस व्यक्त केला होता

.मात्र, या टेकडीनजीक ‘म्हाडा’तर्फे पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यात येणार आहेत. टेकडी त्यासाठी पोखरली जात आहे. या प्रकल्पास स्थगिती द्यावी, अशी मनसेची मागणी आहे. 

युती सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोंगर-टेकड्या पोखरून दगड-माती काढू नये, असे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. उंबार्ली टेकडी वाचविण्यासाठी आरेच्या धर्तीवर मनसे आंदोलन करणार असल्याचे कदम म्हणाले.