शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर थकवल्याने पालिकेने ४३० गाळे केले सील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:46 IST

दहा दिवसांत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मालमत्ताकर थकविल्याने ४३० गाळ्यांना केडीएमसीने सील ठोकले आहे. मागील १० दिवसांत ही कारवाई केली असल्याची माहिती करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी दिली आहे.

थकबाकीदारांनी थकीत मालमत्ताकर भरावा, यासाठी महापालिकेने १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान अभय योजना जाहीर केली होती. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने तिला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेमुळे थकबाकीदारांचे ७५ टक्के व्याज माफ होणार होते. मात्र, या योजनेची मुदत संपल्यावर तिचा लाभ न घेतलेल्या थकबाकीदारांपैकी पाच हजार ७०१ व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतरही कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, अशी नोटीस मालमत्ता विभागाने बाजवली आहे.

या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने ४३० गाळ्यांना सील लावले आहे. मागील १० दिवसांत ही कारवाई केली गेली आहे. यात प्रामुख्याने कल्याण पश्चिमेतील विश्व डेव्हलपर्स यांच्या मालकीची व वीएलसीसीसी यांना भाडेतत्वावर दिलेल्या मिळकतीचा समावेश आहे. या मिळकतींच्या मालमत्ताकरापोटी एक कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. 

पालिकेचे आवाहन अभय योजना जाहीर करूनही या योजनेचा लाभ न घेतलेल्या आस्थापनांच्या विरोधात महापालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे. कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या करवसुली विभागाकडून करण्यात आले आहे.