शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण रायगडमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भाजपा झेंडा फडकवेल - माजी आमदार नरेंद्र पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 13:04 IST

दक्षिण रायगडमधील ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्याच्या भेटी घेत नरेंद्र पवार यांनी वाढवला उत्साह

कल्याण-दक्षिण रायगडमधील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार उभे आहेत, त्या गावांमध्ये भेटी देत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण केला.

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्वाचा घटक आहे, परिवर्तन आणि गाव विकास करण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ताकदीने निवडणूका लढत आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्ते लढत आहेत त्यांना भेटून प्रोत्साहन देणे आणि विश्वास देणे महत्वाचे असते. या निवडणूकांच्या निमित्ताने दक्षिण रायगडमधील निडी, कोडगाव, ऐनघर, पलस, वरवटणे , माळसई, तळवली, चिंचवली तर्फ दिवाळी, खारपटी, घोसाळे, रोठ बुद्रुक, वाशी, दिघी आदी गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रचार यात्रा व बैठकांमध्येही सहभागी झाले व दक्षिण रायगड ग्रामपंचायतींमध्ये भाजपा मुसंडी मारेल असा विश्वास दक्षिण रायगड भाजपा प्रभारी तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.

या दरम्यान पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्राजेश मापारा, युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, कृष्णा बामणे, सुधागड तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.महेश मोहिते, सरचिटणीस .सतीश धारप व मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा व वैकुंठ पाटील, युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष .अमित घाग, रोहा तालुका अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष निमेश वाघमारे, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष .प्रशांत शिंदे, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील,तानाजी देशमुख, लक्ष्मण जांभले,मारुती देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.