शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी

By अनिकेत घमंडी | Updated: July 24, 2023 18:46 IST

संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली.

डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करून सर्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना अवघ्या २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. यात सकाळी मिळालेल्या अर्जावर सर्व सोपस्कार पूर्ण करून सायंकाळपर्यंत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली.

उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा तत्परतेने पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध उपाययोजना केल्या असून त्याचाच भाग म्हणून ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या अर्जांवर शहरी भागात २४ तासांच्या आत तर ग्रामीण भागात ४८ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याची मोहिम सुरू केली आहे.

या मोहिमेंतर्गत उल्हासनगर दोन विभाग कार्यालयातील तानाजी शाखेतील १८ तर नेताजी शाखा कार्यालयातील एक जणाला २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. कल्याण पश्चिम विभागातील पारनाका शाखा दोन अंतर्गत एका व्हेईकल चार्जिंग स्टेशनला तसेच डोंबिवली विभागातील टिळकनगर आणि उमेशनगर शाखेतील प्रत्येकी एकाला २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. यासह वसई, पालघर विभागात जोडणी करण्यात आली. ग्राहकांकडून आनंद व्यक्त अवघ्या एका दिवसात नवीन वीजजोडणी मिळत असल्याने ग्राहकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसत आहे. महावितरणच्या या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी आनंद व्यक्त केला असून महावितरणचे आभार मानले आहेत.  

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण