शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायावर झाला ७० टक्के परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:52 IST

गेल्या महिन्याभरातील जीम व्यवसायावर नजर टाकल्यास जीम चालकांना अपेक्षित असा फायदा झालेला नाही, तसेच व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाणही कमीच आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : लॉकडाऊनमध्ये जीम बंद होते. अनलॉकमध्ये सगळे व्यवहार सुरू होत असताना, सरकारी यंत्रणांनी केवळ मोकळ्या जागेत व्यायामाला मुभा दिली होती. जीम चालविणाऱ्या अनेक संस्थांनी विविध राजकीय मंडळींकडे धाव घेतल्यावर, अनलॉकनंतर जीम सुरू झाले. गेल्या महिन्याभरातील जीम व्यवसायावर नजर टाकल्यास जीम चालकांना अपेक्षित असा फायदा झालेला नाही, तसेच व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाणही कमीच आहे. कारण अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात अद्याप कोरोनाची भीती कायम आहे. यामुळे व्यवसायावर ७० टक्के परिणाण झाल्याचे निरीक्षण जीम चालक, संचालकांनी व्यक्त केले आहे.कल्याण पश्चिमेला बेतूरकर पाडा येथे गेली नऊ वर्षे जीमचा व्यवसाय करणारे जीम चालक अजिंक्य पै यांनी सांगितले की, त्यांच्या जीमची जागा तीन हजार चौरस फुटांची आहे. या जीममध्ये व्यायामाला लागणारे जवळपास २०  प्रकारचे साहित्य आहे. जीममध्ये व्यायाम करणाऱ्यांसाठी प्रत्येकी एक तासाची बॅच केली आहे. प्रत्येक साहित्यात सहा फुटांचे अंतर ठेवले आहे. जीममध्ये प्रत्येकाला प्रवेश देण्यापूर्वी सॅनिटाझर दिले जाते, तसेच त्याला दोन नॅपकिन दिले जातात. एक नॅपकिन घाम पुसण्यासाठी दिला जातो, तर एक नॅपकिन मशीनवर टाकला जातो, जेणेकरून घाम मशीनला लागू नये. तासाभराच्या बॅचनंतर प्रत्येक मशीन सॅनिटाइझ केली जाते. नियम पाळून व्यायाम करणाऱ्यांची काळजी घेतली जाते, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कुणालाही होऊ नये. जीममध्ये प्रवेश करताना मास्क लावणे योग्य आहे. मात्र, मास्क लावून व्यायाम करणे शक्य नाही. प्रत्येक बॅच एका तासाची असल्याने मर्यादा आलेल्या आहेत. कारण प्रत्येकांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्य़ा आहेत. एरवी प्रत्येकाला अनुकूल असलेल्या वेळेनुसार जीममध्ये येत होते. अनलॉकनंतरच्या नियमावलीचा फटका व्यवसायाला बसला आहे. केवळ ३० टक्केच ग्राहक जीमकडे सध्या आहेत. देखभाल खर्च वाढलाजीम संघटनांनी ग्राहकांची फी वाढवू नका, असे सांगितले असले, तरी सॅनिटायझर, नॅपकिनचा खर्च पाहता, देखभाल दुरुस्ती असा एकूणच खर्च वाढला असल्याने केवळ पाचशे रुपयांची वाढ केली आहे. कोरोना काळात किमान ७ लाख रुपयांचा फटका मला बसला असल्याचे पै यांनी सांगितले.