शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, डाेंबिवली रेल्वेस्थानक पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत ५० गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:27 IST

प्रवासी वाहतूक सुरू हाेताच गुन्ह्यांमध्ये वाढ

अनिकेत घमंडीडाेंबिवली : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जूनपासून लाेकलसेवा, तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर. महिलांनाही लाेकलसेवा उपलब्ध करण्यात आली. लाेकलसेवा सुरू हाेताच रेल्वेतील गुन्हेगारी घटनांनीही डाेके वर काढले आहे. कल्याण आणि डाेंबिवलीच्या लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नाेंद झाली.  कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.कल्याण जंक्शन स्थानकात  ४२, तर डोंबिवली स्थानक पाेलीस ठाण्यात आठ गुन्हे नोंदचले गेले. कल्याण स्थानकात उत्तरेसह दक्षिणेला जाणाऱ्या बहुतांशी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, तसेच कसारा, कर्जत, खोपोली मार्गावरून व कल्याण स्थानकातून एक हजारांहून जास्त लोकल फेऱ्या हाेतात. त्यामुळे या स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. त्यात चोरटे त्यांचा डाव साधतात.  डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असले, तरीही त्या स्थानकात फारसे गुन्हे घडत नसल्याचे तीन महिन्यांत निदर्शनास न आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. शार्दुल म्हणाले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात जून ते ऑगस्ट शून्य गुन्ह्यांची नोंद आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये या रेल्वेस्थानकाच्या पाेलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.  

चाेरीचे गुन्हे वाढलेरेल्वेप्रवासादरम्यान जून ते आजतागायत नाेंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे चाेरीच्या गुन्ह्यांचे आहे. आतापर्यंत तीन लाख २७ हजार १६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कल्याणमध्ये सर्वाधिककल्याण-बदलापूर, वांगणी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड, टिटवाळा, आसनगाव, खडवली, वासिंद, कसारा ही गर्दीची स्थानके आहेत. त्यामुळे त्या हद्दीत घडलेली कोणत्याही चोरीची, गुन्ह्यांची नोंद कल्याण स्थानकात होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण कल्याणमध्ये जास्त असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.