शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या तिजोरीमध्ये १०३ कोटींची भर; योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:30 IST

KDMC : मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने अभय योजनेतून मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी १०३ कोटी ९१ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरला संपत असल्याने येत्या चार दिवसांत त्याचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा व त्यांची थकीत रक्कम भरावी, असे आवाहन मनपाने केले आहे.मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला. कोरोनाकाळात थकबाकीदारांकडून सक्तीची करवसुली करता आली नाही. मनपाने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी १५ ऑक्टोबरपासून अभय योजना लागू केली. आतापर्यंत या योजनेतून मनपाला १०३ कोटी ९१ लाख रुपये मिळाले आहेत.अभय योजना लागू करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्रकारांनी विचारले होते की, यापूर्वीही मनपाने सरसकट अभय योजना लागू केली असता तिला अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावर त्यांनी या योजनेतून १०० कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, योजनेची मुदत संपण्यापूर्वीच चार दिवस आधी मनपाच्या तिजोरीत १०३ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले आहेत. येत्या चार दिवसांत आणखीन काही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.मनपाला यापूर्वी जाहीर केलेल्या अभय योजनेतून एक हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, तेव्हा ६५ कोटी जमा झाले होते. परंतु, यंदा १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात यश आले आहे. अभय योजनेचे १०३ कोटी ९१ लाख धरून मनपाने आतापर्यंत २४० कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे.

मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हातीअभय योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आयुक्तांवर अवलंबून असेल. मुदतवाढ न दिल्यास ३५० कोटींचे वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी वसुली विभागाच्या हाती आणखीन तीन महिने आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मालमत्ता करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका