शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

जणू जग थांबले ! फेसबुक तासभर ठप्प !!

By admin | Updated: January 28, 2015 05:39 IST

प्रचंड व्यस्त असतानाही वेळेत वेळ काढून फेसबुक पेजवर धडकणाऱ्या अब्जावधी युजर्सना मंगळवारी दुपारी ‘जणू जग थांबले’

नवी दिल्ली : प्रचंड व्यस्त असतानाही वेळेत वेळ काढून फेसबुक पेजवर धडकणाऱ्या अब्जावधी युजर्सना मंगळवारी दुपारी ‘जणू जग थांबले’ असाच अनुभव आला. तब्बल तासभर फेसबुक ठप्प झाले. काही देश वगळता भारतासह जगभरातील यूजर्सनी फेसबुकच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा अनुभव घेतला. नऊ जून रोजीही असाच व्यत्यय आला होता.भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे बाराच्या सुमारास म्हणजे कार्यालयातले अर्धे काम झाले असताना आणि महाविद्यालयीन तरूणाईचे पहिले काही लेक्चर्स झाले असतानाच अचानक फेसबुक थांबले. लॉग इन करण्याचा प्रयत्न करताच ‘माफ करा, काहीतरी चुकीचे घडले आहे. आम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असून लवकरच ती दूर केली जाईल, असा संदेश पेजवर येत होता. फेसबुकप्रमाणे इन्स्टाग्रामचीही सेवा ठप्प झाली होती. त्याचबरोबर फेसबुक आणि फेसबुक मेसेंजर हे अ‍ॅपही ठप्प झाले होते. संगणकांवर हा अनुभव येत असल्याने अनेकांनी मोबाईलवरुन फेसबुक हाताळण्याचा प्रयत्न केला. तिथेही त्यांना हाच अनुभव आला. नंतर वेबसाईटची एररची माहिती देणाऱ्या ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आयएसयूपी डॉट मी’ या साईटवर अनेकांनी उड्या घेतल्या, तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला. तोपर्यंत आपल्याच इंटरनेटची एरर अशी समजूत अनेकांनी करुन घेतली.