शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सलमान तुरुंगात जाण्याने आम्हाला काय मिळणार?

By admin | Updated: May 7, 2015 01:57 IST

सलमान खानला शिक्षा होऊनही २००२च्या हिट अ‍ॅण्ड रन घटनेत मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांचे अथवा जखमींचे समाधान झालेले नाही.

भरपाई महत्त्वाची : हिट अ‍ॅण्ड रन’मधील पीडितांची प्रतिक्रियामुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला २००२च्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्यात सदोष मनुष्यवधासाठी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली खरी, परंतु त्याने या घटनेत मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांचे अथवा जखमींचे समाधान झालेले नाही. सलमान खानला होणाऱ्या शिक्षेहून आमच्यासाठी नुकसानभरपाई मिळणे महत्त्वाचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमान खानची लॅण्ड क्रुझर वांद्रे येथील अमेरिकन बेकरीच्या बाहेर फूटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर आली, तेव्हा तिच्याखाली चिरडून नुरुल्ला मेहबूब शरीफ याचा मृत्यू झाला होता. याखेरीज कलीम मोहंमद, मुन्ना मलाई खान, अब्दुल्ला रऊफ आणि मुरानी शेख हे चौघे जखमी झाले होते.सलमानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना मयत नुरुल्ला मेहबूब शेख याची पत्नी म्हणाली, की आम्हाला १० लाख रुपये नुकसानभरपाई मिळेल असे सांगण्यात आले; पण या महागाईच्या दिवसांत ही रक्कम किती दिवस पुरणार? त्यापेक्षा माझ्या मुलाला नोकरी मिळाली तर माझा फायदा होईल. या अपघातात पाय गमावलेला अब्दुल्ला रऊफ शेख म्हणतो, की गेल्या १३ वर्षांत मला भेटण्यासाठी कोणीही आले नाही. व्यवसायाने मजूर असणाऱ्या अब्दुल्लाने किरकोळ कामे करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला. मला खूप कष्ट व हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण तरीही माझ्या मनात सलमानबद्दल कटू भावना नाहीत. मी अजूनही त्याचे चित्रपट पाहतो. कोणीही आमच्यावर दबाव आणलेला नाही, हेही त्याने कबूल केले. कोणत्याही इतर बाबींपेक्षा आमच्या दृष्टीने नुकसानभरपाई महत्त्वाची आहे़ या अपघाताने माझे आरोग्य व काम यावर परिणाम झाला आहे, असे शेख याने सांगितले. सलमानला शिक्षा झाली तरी मला काही फायदा होण्यासारखा नाही, माझा पाय परत मिळण्यासारखा नाही, तसेच माझ्या समस्याही कमी होण्यासारख्या नाहीत. पण नुकसानभरपाई पुरेशी मिळाली तर आम्हाला कोणतीही समस्या राहणार नाही, असे शेख म्हणाला. अपघात झाला तेव्हा मी २२ वर्षांचा होतो, असेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)