शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या वर्षी लग्न, १३ व्या वर्षी वैधव्य!

By admin | Updated: June 17, 2015 15:36 IST

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधीच या बस अपघाताने तिच्या नशिबी वैधव्य आले.

बस अपघाताने सोहनी देवीचे आयुष्य उद्ध्वस्तजयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधीच या बस अपघाताने तिच्या नशिबी वैधव्य आले आहे!शुक्रवारी सांस गावात रस्त्यावरून जाणारी एक बस खाली लोंबणार्‍या विजेच्या एका जिवंत तारेच्या संपर्कात आली आणि त्यात सोहनी देवीचा १५ वर्षांचा पती सुखीराम गुज्जर याच्यासह १६ प्रवासी भाजून मृत्युमुखी पडले.ज्या वयात इतर मुले हसत-बागडत शाळेत जातात त्या वयात आपल्यावर कोसळलेल्या या दु:खाची पूर्णांशीने कल्पना येण्याचे खरे तर सोहनी देवीचे वयही नाही. सोहनीचे माहेर चानवाडिया गावातील आहे. बालविवाह झालेली सोहनी देवी इतकी वर्षे माहेरीच राहत आहे. काही वर्षांपूर्वी तिने शाळा सोडली आहे. आता वयात आल्याने काही महिन्यांत तिला रिवाजानुसार पतीच्या घरी पाठविले जायचे होते; पण त्याआधीच नियतीने तिच्यावर हा असा क्रूर घाला घातला आहे.सध्या सुखीरामच्या क्रियाकर्मांसाठी सोहनी देवीला सासरच्या घरी आणण्यात आले आहे; पण अनोळखी घरात आल्याने तिने रडून आक्रोश चालविला आहे. बस अपघातात जखमी झालेल्या २० प्रवाशांवर येथील एसएमएस इस्पितळात उपचार सुरू आहेत. शेजारच्या बच्छेडा गावाचे सरपंच रामदेव गुज्जर त्यासाठी धावपळ करीत आहेत. सोहनी देवीच्या शोकांतिकेने हृदय पिळवटून गेल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. निरागसतेने आक्रोश करणार्‍या सोहनीकडे बघवत नाही, असे पाणावलेल्या डोळ्यांनी सांगताना रामदेव म्हणाले की, लग्नाच्या दिवशी आई-वडिलांच्या मदतीने अग्निभोवती सात फेरे घेणार्‍या दोन वर्षांच्या सोहनीची छबी आजही डोळ्यापुढून जात नाही.सुखीरामनेही दोन-तीन इयत्तांनंतर शाळा सोडली व तो शेतीच्या कामात कुटुंबियांना मदत करायचा.राजस्थानच्या ग्रामीण भागांत आजही बालविवाहांची कुप्रथा प्रचलित आहे. बस अपघातामुळे सोहनी देवीची शोकांतिका समोर आली; पण ही तिची एकटीची शोकांतिका मात्र नक्कीच नाही, असे बालहक्क संघटनेचे कार्यकर्ते रवी शर्मा यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)