शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गव्यापासून वाचण्यासाठी तीन तास काढले झाडावर

By admin | Updated: May 28, 2014 12:57 IST

बोंद्री जंगलातील घटना : भयभीत ग्रामस्थाची पाचावर धारण

मणदूरे : जाईचीवाडी, ता. पाटण येथील येथील संपत पवार गव्यांपासून वाचण्यासाठी झाडावर चढले. तीन तास झाडावर राहूनही गव्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. ही घटना गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेऊन गव्यांना हुसकावून लावले आणि पवार खाली उतरले. बोंद्री येथे घनदाट जंगल आहे. जंगलातच गव्याच्या कळपाचे वास्तव्य आहे. जाईचीवाडीकरांना जंगलातून बोंद्री गावाकडे जावे लागते. संपत पवार यांचे मंगळवारी ग्रामसेवकाकडे काम होते. सकाळी ते बोंद्रीला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. जंगलातील पायवाटेने जात असताना अचानक त्यांच्यासमोर गव्याचा कळप आला. त्यामुळे घाबरून संपत पवार यांनी पाठीमागे धाव घेतली. गव्याच्या कळपानेही त्यांचा पाठलाग सुरू केला. ते झाडावर चढले. कळप खाली येऊन थांबला. काही गवे निघून गेले. मात्र, एक गवा थांबला. आरडाओरडा करूनही तो निघून गेला नाही. दरम्यान, साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बोंद्री येथील निनू मोहिते व तानाजी मोहिते हे जंगल परिसरात काही कामानिमित्त आले होते. त्यांना संपत यांचा ओरडण्याचा आवाज आला. दोघांनी त्याठिकाणी जाऊन गव्याला दगड मारले. मात्र, तो तेथुन हलला नाही. त्यामुळे निनू व तानाजी यांनी गावातून आणखी काही ग्रामस्थांना येथे बोलावले. ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर गवा तेथून जंगलात निघुन गेला. अखेर तीन तासानंतर संपत पवार हे झाडावरून खाली उतरले. (वार्ताहर) जखमीला तुटपूंजी मदत जाईचीवाडी येथील धोंडीराम पवार या शेतकर्‍यावर गतवर्षी गव्याने हल्ला केला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. कºहाड येथील उपजिल्हा रूग्णालय व त्यानंतर कृष्णा रूग्णालयात धोंडीराम यांच्यावर उपचार करण्यात आले. या उपचाराचा खर्च हजारोच्या घरात गेला असताना वनविभागाकडून पवार कुटुंबियांना तुटपूंजी मदत देण्यात आली होती.