शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जगातील एक असं घड्याळ ज्यात कधीच वाजत नाही १२, कारण वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 12:52 IST

A Clock on Town Square  : या शहराचं ११ नंबरशी वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो.

A Clock on Town Square  : सामान्यपणे सगळ्यांनाच हे माहीत आहे की, कोणत्याही घड्याळीमध्ये ११ वाजतानंतर १२ वाजतातच. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एका ठिकाणी असंही घड्याळ आहे ज्यात कधीच १२ वाजत नाही. स्वित्झर्लॅंडमधील सोलोथर्न हे शहर त्याच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतं. या शहराचं ११ नंबरशी वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो.

इथे असलेल्या चर्चेची संख्याही ११ आहे. ११ ऐतिहासिक झरे, ११ संग्रहालय आणि ११ टॉवर आहेत. येथील सेंट उर्सूसच्या मुख्य चर्चमध्ये तुम्हाला ११ क्रमांकासोबत लोकांचा विशेष स्नेह बघायला मिळेल. या चर्चचं बांधकाम ११ वर्षात करण्यात आलं होतं. इथे पायऱ्यांचे तीन सेट आहेत. प्रत्येक सेटमध्ये ११ पायऱ्या, ११ दरवाजे, ११ घंट्या आहेत. ११ क्रमांकाचं येथील लोकांच्या जीवनात खास महत्त्व आहे. प्रत्येक ११व्या वाढदिवसाला इथे खास समारोहाचं आयोजन केलं जातं. प्रॉडक्टच्या नावांमध्ये ११ क्रमांक जुळला आहे. जसे की, ऑफी बिअर म्हणजेच बिअर ११, ११ आई चॉकोलेड(११ चॉकलेट).

घड्याळात वाजत नाही १२

अशाप्रकारच्या घड्याळाबाबत वाचून तर तुम्हीही आश्चर्यचकित झाले असाल. या शहरातील मुख्य चौकात एक घड्याळ आहे. या घड्याळात तासांच्या केवळ ११ रेषा आहेत. ११ यातून गायब आहे.

काय आहे कारण?

सोलोथर्नमधील लोकांना क्रमांक ११ सोबत इतका का जिव्हाळा आहे याच्या वेगवेगळ्या थेअरी आहेत. एका थेअरीनुसार, सोलोर्थनचे लोक फार मेहनत करतात, पण त्यांच्या जगण्यात आनंद नव्हता. काही काळाने शेजारच्या डोंगरातून पऱ्या येऊ लागल्या. त्या पऱ्या लोकांना प्रोत्साहन देत होत्या आणि त्यांचं कौतुक करत होत्या. याने लोकांमध्ये आनंद भरला गेला. 

पऱ्यांना तसं इंग्रजीमध्ये एल्फ म्हटलं जातं आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ ११ होतो. लोकांनी अशाप्रकारे त्या पऱ्यांना ११ क्रमाकांशी जोडलं होतं आणि त्यांच्या उपकारांची आठवण म्हणून ११ क्रमांकाला महत्त्व देऊ लागले. दुसरी एक थेअरी सांगते की, याचा संबंध बायबलसोबत आहे. बायबलमध्ये ११ क्रमांकाला खास क्रमांक सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच येथील लोकांमध्ये या क्रमांकाबाबत खास प्रेम आहे. 

काय आहे इतिहास?

सोलोथर्नच्या इतिहासात ११ क्रमांकाचा उल्लेख पहिल्यांदा १२५२ मध्ये आढळतो. असे सांगितले जाते की, याचवर्षी शहराच्या काउन्सिलसाठी ११ सदस्यांची निवड करण्यात आली होती. नंतर १४८१ मध्ये सोलोथर्न स्विस संघाचा ११ वा क्रंटोन झाला. नंतर अनेक वर्षांनी याला ११ प्रॉटेक्टोरेट्समध्ये विभागण्यात आलं. या ठिकाणाच्या इतिहासात मध्यकाळात ११ समुदायांचा उल्लेखही आढळतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स