शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे नीरंक, तरीही साथ रोगाचा उद्रेक!

By admin | Updated: May 28, 2014 13:01 IST

अकोला आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह लागले असून जिल्ह्यातील २३६ गावे जोखीमग्रस्त!

अकोला : पावसाळ्य़ाच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात साथ रोगाच्या उद्रेकाची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागातर्फे सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत २३६ गावे जोखीमग्रस्त असल्याचे दर्शविण्यात आले. असे असले तरी साथ रोगाच्या उद्रेकाची स्थिती मात्र नीरंक दर्शविण्यात आल्यानंतरही जिल्ह्यात दोन गावांमध्ये साथ रोगाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. अकोला जिल्ह्यातील मागील दहा वर्षांत ज्या गावांमध्ये साथ रोग आणि जलजन्य आजाराची लागण झाली होती, अशा गावांचा सर्व्हे मे महिन्यात करण्यात आला. यात सातही पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३६ गावे जोखीमग्रस्त असल्याचे आढळून आले. या सर्व्हेमध्ये २३६ गावांमधून ३६१ पाणी नमुने घेण्यात आले. याशिवाय ६८२ रक्त नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्यात आली. ५ सिरम नमुने घेण्यात आले होते. हा सर्व प्रयोग सुरू असताना जिल्ह्यात एकही गोवरचा रुग्ण आढळून आला नाही. सर्व्हेच्या निकषानुसार जिल्ह्यात मलेरिया किंवा डेंग्यू यासारख्या कीटकजन्य आजारांची लागण होईल, असे डास आढळून आले नाही.