शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयची महाभरती; यंदा ७,२00 पदे भरणार

By admin | Updated: June 16, 2014 22:54 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) ८,१00 कर्मचारी चालू आर्थिक वर्षात निवृत्त होत आहेत. त्यामुळे ७२00 पदांची भरती करण्याची तयारी बँकेने चालवली आहे

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) ८,१00 कर्मचारी चालू आर्थिक वर्षात निवृत्त होत आहेत. त्यामुळे ७२00 पदांची भरती करण्याची तयारी बँकेने चालवली आहे.स्टेट बँक आॅफ इंडिया ही भारतातील सर्वांत मोठी बँक आहे. बँकेने तंत्रज्ञानविषयक अवलंबित्व वाढविण्याचा निर्णयही बँकेने घेतला आहे. दैनंदिन कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा सहभाग वाढविला जाणार आहे. एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, आमच्या कर्मचाऱ्यांना सहाय्य होईल, अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान बँकेत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सहजपणे आणि कमी वेळात पार पडतात. तसेच त्यासाठी मेंदूला फार ताण देण्याचीही गरज नाही. उदा. नोटा मोजण्याचे मशीन अल्पावधीत नोटा मोजून देते. या मशीनमुळे कॅशिअरचा वेळ आणि कष्ट वाचतात. भट्टाचार्या यांनी सांगितले की, बँक शाखांमध्ये रोख रकमेचा भरणा करण्यासाठी ‘कॅश डिपॉजिट मशीन’ बसविण्याची आमची योजना आहे. सध्या हे काम कर्मचारी करतात. त्यासाठी प्रत्येक शाखेत टेलर काऊंटर आहेत. या काऊंटरांवर मोठा कर्मचारी वर्ग बँकेला तैनात करावा लागतो. कॅश डिपॉजिट मशीन बसविल्यानंतर हे मनुष्यबळ बँकेला इतरत्र वळविता येईल. याशिवाय कॅश रिसायकल मशीन आणण्याचाही बँकेचा प्रयत्न आहे. ही यंत्रे डिपॉजिट केलेल्या नोटा लगेच एटीएम मशीनला पुरवितात. हे काम आॅटोमेटिक होते. याशिवाय खऱ्या आणि खोट्या नोटा ओळखण्याची क्षमताही या मशीनमध्ये आहे. भरणा केलेल्या रोख रकमेत असलेल्या बनावट नोटा हे मशीन नाकारून बाहेर फेकते. तसेच ग्राहकाने केलेल्या भरण्यातून तेवढी रक्कम वजाही करते. अशा प्रकारची ४,५00 रिसायकल यंत्रे बँक खरेदी करेल. एसबीआयचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जे.एन. मिश्रा यांनी सांगितले की, संपूर्ण बँकिंग इंडस्ट्रीलाच सध्या मनुष्यबळाची चणचण भासत आहे. त्यातल्या त्यात सरकारी बँकांत अधिक मनुष्यबळ टंचाई आहे. २0२0 पर्यंत अ. जनरल मॅनेजर दर्जाचे ७५ टक्के अधिकारी निवृत्त होत आहेत. बँकांना मोठे मनुष्यबळ लागणार आहे. एसबीआयने १,८३७ प्रोबेशनरी अधिकारी आणि ५,४00 सहायक अधिकारी भरण्याची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)