शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सलमानच्या वादांचे रिमेक

By admin | Updated: May 7, 2015 02:25 IST

बॉलीवूडच्या लाडावलेल्या वा काहीशा बिघडलेल्या कलाकारांच्या यादीत सलमान खानचे नाव अव्वल स्थानी आहे.

बॉलीवूडच्या लाडावलेल्या वा काहीशा बिघडलेल्या कलाकारांच्या यादीत सलमान खानचे नाव अव्वल स्थानी आहे. २५ वर्षांहून अधिक काळाच्या दीर्घ कारकिर्दीत सलमानला वारेमाप प्रसिद्धी मिळाली असली, तरी वादांचीही त्याच्या नावे मोठी यादी आहे. बॉलीवूूडच्या ‘बॅड बॉय’ यादीत सलमानचे नाव कायम राहिले. त्यामुळे वादांनी त्याची पाठ सोडली नाही. सलमानचे नाव नेहमीच आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या काही लोकांमध्ये घेतले जाते. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याचे मॉडेलिंगमधील यशानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या संगीता बिजलानीसोबत पहिले अफेअर होते. सुमारे दोन वर्षे हे अफेअर टिकल्यानंतर कोणत्याही वादाशिवाय यावर पडदा पडला. संगीता बिजलानीनंतर अमेरिकेहूून बॉलीवूडमध्ये अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला आलेल्या सोमा अलीशी त्याचे अफेअर जमले. तिने सलमानसोबत ‘पतंगा’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट अल्पावधीतच काळाच्या पोटात गडप झाला. मात्र सलमानसोबतचे तिचे नाते पुढेही चालूच राहिले. सोमासाठी सलमानने वांद्र्याच्या पॉश भागात फ्लॅट खरेदी करून दिले. एवढेच नाही, तर दोन-तीन चित्रपटांत काम करण्याची संधीही मिळवून दिली. जवळपास असाच किस्सा ऐश्वर्या रायसोबत सलमानचे संबंध जुळल्यानंतर घडला. संजय लीला भन्साळीचा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’च्या चित्रीकरणादरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. ऐश्वर्यासाठी सलमान अक्षरश: वेडा झाला होता, असे बोलले जाते. ऐश्वर्याच्या नादात सलमान खानचे विवेक ओबेरॉयशीही प्रचंड मतभेद झाले. विवेकच्या घरी एका रात्री ४२ फोन कॉल्स केल्याचा वाद एवढा वाढला, की एकावेळी त्याने थेट सलमानला समोर येण्याचे आव्हान दिले. कारण तोपर्यंत विवेक स्वत:ला ऐश्वर्याचा नवा बॉयफ्रेंड मानत होता. काही काळानंतर त्याचे ऐश्वर्याशी अफेअर तुटले. यानंतर विवेक ओबेरॉयने सलमानची माफी मागण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र सलमानला आजही विवेक ओबेरॉयचे नावही ऐकणे आवडत नाही.ऐश्वर्याच्या ब्रेकअपमुळे सलमानचा चांगलाच मनोभंग झाला होता. अशावेळी कॅटरिना कैफ त्याच्या आयुष्यात आली. आज भलेही कॅटरिनाचे नाव रणबीर कपूरशी जोडले जात आहे. मात्र गरज पडल्यास रात्री तीन वाजताही कॅटरिना सलमानला मदतीचे आवाहन करते. सलमानही तिच्या मदतीला धावून जातो. ऐश्वर्यासाठी सलमानची विवेकशी चांगलीच जुंपली होती. कॅटरिनावरून सलमान आणि शाहरुख खान यांच्यात असाच वाद झाला होता. दोघांमध्ये मतैक्य होण्याच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर सलमान आणि शाहरुख यांचे कधीच मनोमिलन होणार नाही, असे मानले जात होते. मात्र काही काळापूर्वी हा दुरावा निवळल्याचे चित्र आहे. सलमानच्या वादाचा आणखी एक पैलू माध्यमांशी मतभेदांचा राहिला. सलमान खान अनेकदा माध्यमांवर घसरत असे. माध्यमांशी त्याचे मतभेद अजूनही दिसून येतात. अंडरवर्ल्ड म्होरक्याशी बातचीत करीत असतानाची एक टेप बाहेर आल्यानंतरही सलमानच्या वादग्रस्ततेला नवे वळण मिळाले. तथापि, नंतर हे प्रकरण शांत झाले होते.