शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

सचिनचा आदर्श स्ट्रोक, दत्तक घेतलेल्या गावाचे केले मेकओव्हर

By admin | Updated: April 12, 2015 15:38 IST

खासदार सचिन तेंडुलकरने चार महिन्यांपूर्वी पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले व अवघ्या चार महिन्यात या गावाने कात टाकत विकासाची वाट धरली आहे.

ऑनलाइन लोकमत पुत्तमराजू कंद्रिगा (आंध्रप्रदेश), दि. 12 - आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा गाव... अवघी 400 लोकसंख्या असलेल्या या गावात पाणी नव्हते, स्वच्छतागृहांची वानवा होती.. मात्र.खासदार सचिन तेंडुलकरने चार महिन्यांपूर्वी हे गाव दत्तक घेतले व अवघ्या चार महिन्यात या गावाने कात टाकत विकासाची वाट धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आदर्श ग्राम योजना जाहीर केली होती. यामध्ये प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करणे आवश्यक होते. खासदारांनी गाजावाजा करत गाव दत्तक घेतले असून या गावांसाठी लाखो रुपयांच्या योजनाही आखण्यात आल्या. मात्र अद्याप या विकास कामांची सुरुवात झालेली नाही. क्रिकेटनंतर संसदेत खासदारकीची इनिंग सुरु करणारा सचिन तेंडुलकर याला अपवाद ठरला आहे. सचिनने दत्तक घेतलेल्या पुत्तमराजू कंद्रिगा या गावात अवघ्या  चार महिन्यांमध्येच विकासाची गंगा वाहू लागली आहे. सचिन तेंडुलकरने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गावात सुमारे 2.79 कोटी रुपयांचा खासदार निधी खर्च केला. यातून गावात 24 तास पाणी व वीज पुरवठा देण्याचे काम सुरु झाले आहे. याशिवाय गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार व सांडपाणी प्रक्रीया केंद्र बांधण्याचे कामही वेगात सुरु आहे. गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. अवघ्या चार महिन्यात या गावाचे रुप बदलत असून गावात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक सार्वजनिक सभागृहदेखील बांधले जात आहे. चार महिन्यांपूर्वी आमच्या गावात कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या. पण सचिन तेंडुलकर यांनी आमचे गाव दत्तक घेताच गावाचा चेहरामोहराच बदलत आहे असे भास्कर राव या ग्रामस्थाने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. गावात 110 घरं असून गावाची लोकसंख्या 399 एवढी आहे. लिंबू व मिरचीची शेती हे या गावातील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. सध्या गावातील प्रत्येक जण सचिनचे आभार मानत आहे. सचिनच्या हा आदर्श खेळीचे अन्य खासदार कधी अनुकरण करतील हा मोठा प्रश्न आहे.