शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप कायम

By admin | Updated: June 13, 2014 03:11 IST

यपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळ एक कार्यरत राहील. तर, अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस करण्याचे अधिकार आस्थापना क्रमांक दोनकडे

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांमधील अंतिम राजकीय हस्तक्षेपाचे अधिकार सत्तारुढ पक्षाकडे कायम ठेवत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळे स्थापन करण्याची तरतूद असलेले महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक गुरुवारी रात्री विधानसभेने मंजूर केले. त्यानुसार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळ एक कार्यरत राहील. तर, अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस करण्याचे अधिकार आस्थापना क्रमांक दोनकडे असतील. विभागीय पातळीवर पोलीस महानिरीक्षक त्याचे अध्यक्ष असातील. दोन्ही बाबतीत अंतिम अधिकार मात्र राज्य शासनाचा असेल.पोलीस शिपायाची बदली यापुढे चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत होणार नाही. म्हणजेच एका पोलीस ठाण्यात तो ६ वर्षे असेल. अपरिहार्य कारणास्तव त्याला बदली हवी असेल तर आस्थापना मंडळाकडे तसे कारण सादर करावे लागेल. पोलीस महासंचालकांचा कार्यकाळ किमान दोन वर्षांचा असेल. त्या आधी त्यांनी निवृत्तीचे वय गाठले तर त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही. कारण आयपीएस अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढविण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही.सर्वोच्च न्यायालयाने पोलीस दलामध्ये राजकीय मनमानी रोखण्यासाठी तसेच पारदर्शकता आणण्यासाठी व पोलिसांना न्याय मागता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कायदा करण्याचे निर्देश दिले होते. आजच्या कायद्यामुळे पोलीस दलात अधिक पारदर्शकता येईल, बदल्यांचे विकेंद्रीकरण होईल, असा विश्वास गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला. गुरुवारी मंजूर झालेल्या विधेयकात राज्य पातळीवर पोलीस तक्रार निवारण समिती आणि विभागीय पातळीवरील सहा समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे. राज्य समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तर जिल्हा समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश असतील. या समित्यांकडे पोलिसांविरुद्ध कोणालाही तक्रार करता येईल. तसेच पोलिसही दाद मागू शकतील. पोलिसांविरुद्ध केलेली तक्रार खोटी ठरल्यास शिक्षेची तरतूद आहे. (विशेष प्रतिनिधी)