शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

हवामानाच्या अंदाजाला उत्तुंग इमारतींचा अडथळा

By admin | Updated: July 4, 2014 08:56 IST

मुंबईचे अचूक हवामान टिपणाऱ्या डॉप्लर रडारला उत्तुंग इमारतींचा अडथळा येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, याविरोधात बांधकाम व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले आहेत.

मुंबई : मुंबईचे अचूक हवामान टिपणाऱ्या डॉप्लर रडारला उत्तुंग इमारतींचा अडथळा येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, याविरोधात बांधकाम व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या याचिकेवर न्या़ अनुप मोहता व न्या़ अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात अ‍ॅडव्होकेट जनरल डी़जे़ खंबाटा यांनीही हे यंत्र चुकीच्या ठिकाणी असल्याचा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, हवामान खात्याला अंदाज मिळत नाही. म्हणून उत्तुंग इमारती असू नयेत हे चुकीचे आहे़ जगात प्रत्येक अत्याधुनिक शहरात हवामान खात्याचे यंत्र असून उंच इमारतीही आहेत़ हवामान खात्याने हे यंत्र दुसरीकडे हलवावे वा अतिरिक्त यंत्र बसवावे़महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले़ हे यंत्र २०१०मध्ये नेव्ही नगरमध्ये बसवण्यात आले़ त्या वेळी या विभागात उंच इमारती होत्याच याकडेही याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले़ त्यावर न्यायालयाने हवामान खात्याला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले़ मुळात उंच इमारतींचा नेमका अडथळा काय असून संबंधित विभागात उंच इमारती असताना हे यंत्र कसे बसविले? हे यंत्र आता तेथून हलवणार की नाही याचा खुलासा खात्याने करावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे़ यावर १४ जुलैला सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)