शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘दादा’ होण्यासाठी दोन मुलांनी गाठली मुंबई

By admin | Updated: June 10, 2014 14:13 IST

औरंगाबाद : चित्रपट, टीव्ही मालिका व आजूबाजूच्या वातावरणाचा मुलांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा प्रत्यय इंदिरानगर, गारखेडा परिसरातील दोन कुटुंबांना चांगलाच आला.

औरंगाबाद : चित्रपट, टीव्ही मालिका व आजूबाजूच्या वातावरणाचा मुलांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा प्रत्यय इंदिरानगर, गारखेडा परिसरातील दोन कुटुंबांना चांगलाच आला. अवघ्या १०-११ वर्षांच्या दोन्ही बालकांनी ‘मुंबई जाकर हम दादा बनिंगे... वहाँच बडे बनेंगे’ असा विचार करून ते गुपचूप रेल्वेने मुंबईला पळून गेल्याची घटना ५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. त्याचे झाले असे की, इंदिरानगर, गारखेडा परिसरातील रहिवासी शेख शाहरुख यांचा १० वर्षांचा मुलगा शेख आदिल व शेख अनिस यांचा ११ वर्षांचा मुलगा शेख मेहराज हे दोघे जण मित्रांसोबत खेळायला जातो म्हणून गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. आदिल व मेहराज हे दोघे जण जिवलग मित्र. दोघेही यंदा ५ वीत गेले आहेत. दोघांच्या शाळा वेगवेगळ्या असल्या तरी एकाच वसाहतीत राहत असल्यामुळे ते दोघे सतत सोबत राहायचे. गुरुवारी सकाळी खेळता खेळता दोघांनी येथून मुंबईला पळून जाण्याचा विचार केला. ‘मुंबईत जाऊ. तेथे काहीही कामधंदा करून मोठे होऊ. मुंबईचे आपण दादा बनून पैसे कमवू’ असा विचार केला व रेल्वेने बसून कल्याण गाठले. कल्याण रेल्वेस्टेशनवर ते दोघेही उतरले. तेव्हा त्यांना तेथील पोलिसांनी हटकले. तेव्हा आमचे आई-वडीलही येथेच झोपले आहेत, अशी थाप मारून ते निसटले. रात्रभर ते कल्याण रेल्वेस्टेशनमधील एका प्लॅटफॉर्मवरच झोपले. तिसऱ्या दिवशी मात्र, त्यांची वाईट अवस्था झाली. त्यामुळे त्यांनी परत औरंगाबादकडे जाणारी रेल्वे पकडली. दुर्दैव असे की, मेहराजला नेमकी त्यावेळी तहान लागली अन् तो खाली उतरला. तेवढ्यात रेल्वे निघाली. आदिल शेख हा सुखरूप औरंगाबादला आपल्या आई- वडिलांकडे पोहोचला. मेहराजच्या शोधार्थ त्याचे आई- वडील कल्याणकडे रवाना झाल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे जमादार आर. डी. नरवडे यांनी दिली.