शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खासदाराचे फणस चोरीला, पोलिस यंत्रणा लागली कामाला

By admin | Updated: June 20, 2014 14:45 IST

दिल्लीत जनता दल संयुक्तचे खासदार महेंद्र प्रसाद यांच्या निवासस्थानातील फणसाच्या झाडावरील दोन फणस चोरीला गेल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २० -  नेते पोलिसांना कशासाठी कामाला लावतील याचा नेमच नसतो. आता दिल्लीत जनता दल संयुक्तचे खासदार महेंद्र प्रसाद यांच्या निवासस्थानातील फणसाच्या झाडावरील दोन फणस चोरीला गेल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे. यावर कळस म्हणजे दिल्ली पोलिसांनीही या 'गंभीर' घटनेची तातडीने दखल घेत बंगलाच्या आवारातून बोटांचे ठसेही जमा केले आहेत. 
जदयूचे राज्यसभेतील खासदार महेंद्र प्रसाद यांच्या तुघलक रोड येथील बंगल्यात फणसाचे झाड आहे. या झाडावरील नऊपैकी दोन फणस चोरीला गेल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. प्रसाद यांनी या घटनेची माहिती खासगी सचिवाला दिली व त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बलात्कार, हत्यासारखे गुन्हे रोखण्यात अपयशी ठरलेल्या दिल्ली पोलिसांनी या गुन्ह्यात मात्र कमालीची सतर्कता दाखवली. नेत्याच्या घरात चोरी झाल्याने दहा पोलिस अधिका-यांचे पथक प्रसाद यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी बंगल्याच्या आवाराची पाहणी करुन हाताचे ठसे जमा केले. बगिच्यातील पायांच्या ठशांवरुन बाहेरुन आलेल्या लहान मुलांनी ही चोरी केली असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. हाताचे ठसे जमा करुन फॉरेंसिक लॅबकडे पाठवले आहेत. सध्या बंगल्यातील सुरक्षा रक्षक, सेवक आणि वाहनचालकांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
दरम्यान,यापूर्वी उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या घरातून हरवलेल्या म्हशी शोधण्यासाठी पोलिस यंत्रणेला कामाला लावल्याचे समोर आले होते.