शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

१0 लाखासाठी मोडले लग्न; कृषी सहायकाचा प्रताप

By admin | Updated: May 28, 2014 13:01 IST

दहा लाखांची रक्कम मागितल्यामुळे लग्न मोडल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील अंबिकापूर येथे उघडकीस आला.

बोरगाव मंजू : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लग्नाची तयारी सुरू असताना ऐन वेळेवर दहा लाखांची रक्कम मागितल्यामुळे लग्न मोडल्याचा प्रकार अंबिकापूर येथे उघडकीस आला. वधूपित्याने या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसात तक्रार नोंदविली असून, रिधोरा येथील कृषी सहायक संजय नारायण पातोंड याच्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव मंजू आरोपीचा शोध घेत आहेत. अंबिकापूर येथील एका शेतकर्‍याच्या मुलीचा विवाह कृषी सहायक असलेल्या संजय नारायण पातोंड याच्यासोबत ३0 मे २0१४ रोजी ठरला होता. आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती वधूपित्याने आधीच दिली होती. या सर्व गोष्टी वराकडील मंडळींनी मान्य केल्यात. यानंतर कपडे आणि सोने मुलगा आणि मुलीकडील मंडळी करणार यावर एकमत झाल्यानंतर ३0 मे २0१४ रोजी लग्नाची तारीख निश्‍चित करण्यात आली. सुनील वसतकार यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली. वधूपिता लग्नाच्या तयारीला लागल्यानंतर वराकडील मंडळीपैकी संजय नारायण पातोंड, जागृती विद्यालयात शिक्षिका असलेल्या ललिता नारायण पातोंड व मेहकर येथे ग्रामसेवक असलेला सुरेश नारायण पातोंड यांनी हुंडा कमी झाल्याचे कारण पुढे करू न पुन्हा पाच लाखाचे सोने व पाच लाख नगदी अशी रक्कम मागितली असा आरोप तक्रारीत करण्यात आला. दहा लाख रुपयांचा हा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने वधूपिता हादरले. त्यांनी तत्काळ संजय पातोंड याच्याशी नातेवाइकाच्या मध्यस्थीने संपर्क केला; परंतु संजय, ललिता आणि सुरेश रा.सस्ती वाडेगाव यांनी वधूपित्याची विनंती धुडकावून लावली. साक्षगंध झाल्यानंतर हा प्रकार घडल्याने मुलीकडील मंडळींना धक्का बसला. अखेर वधूपित्याने बोरगाव मंजू पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0 ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक आव्हाळे करीत असून, आरोपींच्या शोधात पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली