शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

कच-यात महाराष्ट्र आघाडीवर!

By admin | Updated: April 6, 2015 04:54 IST

देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदेशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे. शहराची कचरापट्टी करण्यात मुंबईकरांनी दिल्लीकरांनाही मागे टाकले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील सव्वाशे कोटी नागरिक रोज १ लाख ४३ हजार ४४९ टन कचरा करतात. त्यात महाराष्ट्रात तयार होणाऱ्या २६,८२० टन दैनिक कचऱ्याचा वाटा १८ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी फक्त ४,७०० टन कचऱ्याचीच पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते, बाकीचा कचरा प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतो.देशात घनकचरा व्यवस्थापनाची एकूण काय स्थिती आहे याविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमध्ये दररोज १९,१८० टन, आंध्र प्रदेश/ तेलंगणमध्ये ११,५०० टन, गुजरातमध्ये ९,२२७ टन, कर्नाटकात ८,७८४ टन तर दिल्लीत ८,३९० टन कचरा तयार होतो.अहवालानुसार जेथे रोज १०० ते ५०० टन कचरा तयार होतो अशी ७० शहरे आहेत तर ५० ते १०० टन दैनिक कचरानिर्मिती करणाऱ्या शहरांची संख्या ६० आहे. दररोज ५०० टन किंवा त्याहून अधिक कचरा तयार होणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, सूरत, आग्रा, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ आणि कोलकाता यांचा समावेश होतो.