शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रा पोहोचली ठाण्यात

By admin | Updated: July 14, 2014 08:50 IST

भुट्टे विक्रेत्याच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत शोकसंतप्त जमाव भुट्टे विक्रेत्याच्या मृतदेहासह गिट्टीखदान ठाण्यात धडकला. यामुळे गिट्टीखदान ठाण्याच्या परिसरात

भुट्टा विक्रेत्याचे हत्या प्रकरण : गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तणाव नागपूर : भुट्टे विक्रेत्याच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत शोकसंतप्त जमाव भुट्टे विक्रेत्याच्या मृतदेहासह गिट्टीखदान ठाण्यात धडकला. यामुळे गिट्टीखदान ठाण्याच्या परिसरात आज दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना आपल्या हवाली करावे आणि मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करीत जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारात पाऊणतासावर घोषणाबाजी केली. पोलिसांनी संयमाने स्थिती हाताळून शोकसंतप्त जमावाची समजूत काढण्यात यश मिळवले. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. महिंद्र माताचरण शाहू (वय ४५) या भुट्टे विक्रेत्याची क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी सायंकाळी आरोपी गुड्डू ऊर्फ विजेंद्रसिंग चंदेल आणि संदीप समुद्रे (रा. दोघेही झिंगाबाई टाकळी) या गुंडांनी निर्घृण हत्या केली होती. गोधनी मार्गावरील पांडुरंग मंगल कार्यालयाजवळ झालेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात शुक्रवारी रात्रीपासून संतप्त वातावरण आहे. आज दुपारी १ च्या सुमारास शाहूच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह घेऊन गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. शाहूची हत्या करणाऱ्या आरोपींना आमच्या हवाली करा, अशी संतप्त जमावाची मागणी होती. त्यासाठी जमावातील काही जण चिथावणीची भाषा वापरत होते. मृत शाहूला पत्नी आणि दोन मुले आहेत. घरातील कर्ता जीव गेल्याने शाहू कुटुंबीय अक्षरश: उघड्यावर आले आहे. त्यामुळे दोन्ही मुलांना पाच-पाच लाखांची आर्थिक मदत मिळावी, अशीही जमावाची मागणी होती. परिस्थिती चिघळू शकते, हे ध्यानात घेत पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. आर्थिक मदत देणे पोलिसांच्या अधिकारात नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे अर्ज करावा लागेल, असे समजवून सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही बोंडे यांनी सांगितले. मृतदेहाची आणखी जास्त वेळ अवहेलना करू नका, तातडीने अंत्यसंस्कार करा, असे भावनिक आवाहन बोंडे यांनी केले. त्यामुळे शोकसंतप्त जमावाने पोलीस ठाण्याचा आवार सोडला. यानंतर शाहूवर अंत्यसंस्कारकरण्यात आले. (प्रतिनिधी)