शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

तीनवेळा फासावर लटकवूनही जिवंत राहिली ही व्यक्ती, इतिहासाच्या पानांवर नोंदवलं आहे त्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:29 IST

जॉन पुन्हा पुन्हा तो निर्दोष असल्याचं सांगत होता. पण अर्थातच घटनास्थळी त्याच्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं. तसेच त्याच्या हातावरील निशाणही याकडे इशारा करत होते की, याने काहीतरी केलंय.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते, त्याचं मरण निश्चित मानलं जातं. शिक्षा ठरल्यावरच कैद्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. या व्यक्तीच्या डोक्यात तो मरणार हे माहीत असल्याने सतत काहीना काही विचार सुरू राहतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याला तीनवेळा फाशी देण्यात आली, पण तरी त्याचा जीव गेला नाही.

आम्ही तुम्हाला सांगतोय जॉन ली या व्यक्तीबाबत.  जॉन ली एका महिलेच्या घरी नोकरी करत होता. ती महिला फार श्रीमंत होती. एका दिवस महिलेच्या घरी चोरी होते आणि चोरीच्या आरोपात महिला जॉन ली ला कामाहून काढते. त्यानंतर १८८४ मध्ये त्याला इंग्लंडच्या एका गावातून एका महिलेच्या  हत्येच्या आरोपात अटक झाली होती. मात्र, तो निर्दोष असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण काही पुरावे असे सापडले होते की, ज्यातून तोच दोषी असल्याचं सिद्ध होत होतं.

दुसरीकडे जॉन पुन्हा पुन्हा तो निर्दोष असल्याचं सांगत होता. पण अर्थातच घटनास्थळी त्याच्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं. तसेच त्याच्या हातावरील निशाणही याकडे इशारा करत होते की, याने काहीतरी केलंय. मग ब्रिटीश पोलिसांनी जास्त डोकं न खर्ची, जास्त वेळ न घालवता जॉनला गुन्हेगार मानत कोर्टात केस सुरू केली. कोर्टानेही त्याला दोषी ठरवलं आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

२३ फेब्रुवारी १८८५ ला जॉनला तोंड झाकून फासावर लटकवण्यासाठी नेण्यात आलं. जल्लादाने त्याला फाशी देण्यासाठी ह्रॅंडल खेचलं. पण हैराण करणारी बाब म्हणजे जॉनच्या खाली असलेला लाकडाचा दरवाजा उघडलाच नाही. जल्लादाने अनेकगा हॅंडल खेचून पाहिलं, पण काही फायदा झाला नाही. जॉन फाशीपासून वाचला.

दुसऱ्या दिवशी जॉनला पुन्हा फाशी देण्यासाठी नेण्यात आलं. तर त्या दिवशीही दरवाजा उघडला नाही आणि लागोपाठ तीनदा असं झाल्यावर हे प्रकरण कोर्टात गेलं. जिथे याची चौकशी करण्यात आली की, हे का होतंय? का एक व्यक्ती फाशीच्या शिक्षेतून तीन-तीनदा वाचला. आजपर्यंतच्या इतिहासात असं की झालं नव्हतं. केस हाय अथॉरिटीपर्यंत गेली. पूर्ण चौकशी केल्यावर समोर आलं की, एका लोखंडाच्या तुकड्यामुळे दरवाजा पूर्णपणे जाम झाला होता. त्यामुळे तो उघडत नव्हता. यानंतर लोकांना हेच वाटलं की, जॉनचा देवावर विश्वास होता आणि देवानेच त्याची मदत केली होती.

या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने जॉनची शिक्षा माफ केली होती. कोर्टाने सांगितलं होतं की, जॉनला तीनवेळा मृत्यूच्या शिक्षेची जाणीव झाली आहे. इतकी शिक्षा त्याच्यासाठी पुरेशी आहे. १९ फेब्रुवारी १९४५ लाक जॉनचं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं होतं. पण त्याचं नाव आजही इतिहासाच्या पानावर आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके