शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

घराचं वॉटरप्रूफिंग

By admin | Updated: July 10, 2015 21:46 IST

उन्हाच्या चिकचिकाटातून सोडवणारा पावसाळा हा तसा अनेकांचा आवडता ऋतू. अनेकांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. तर काहींना घरातच बसून पावसाचा आनंद लुटायचा असतो.

उन्हाच्या चिकचिकाटातून सोडवणारा पावसाळा हा तसा अनेकांचा आवडता ऋतू. अनेकांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. तर काहींना घरातच बसून पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण, याच पावसाळ्यात घराची नीट काळजी घेतली नाही तर हा पाऊस घरासाठी धोकादायक ठरू शकतो. आणि घरात बसून मनसोक्त पाऊस अनुभवण्याच्या आनंदावरच विरजण पडू शकते त्यामुळे पावसापासून घराची काळजी घेणे खूप आवश्यक ठरते. यासाठी काही गोष्टींची खातरमजा करणेही महत्वाचे ठरते. भिंती आणि छप्पर गळके नाही ना, याची खात्री करून घ्या. छप्पराला गळती किंवा भिंतीत ओलावा आला असेल तर त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. गच्चीतील भेगा भरून मग वॉटरप्रुफिंग करायला हवे. छतावर पडणारे पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी जर पाईप असेल तर तो सातत्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे गच्चीवरच पाणी साठून राहणार नाही.

घरातील सर्वाधिक ओलावा येणाऱ्या ठिकाणी व्हेंटिलेटर्सची सोय करायला हवी. पाऊस सातत्याने कोसळत राहिला तर अशा सततच्या ओलाव्याने घरातील लोकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरात ताजी हवा येणे हे देखील गरजेचे आहे.घरातील विद्युत उपकरणांची जोडणी व्यवस्थित आहे ना, याची पाहणी पावसाच्याआधीच करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात हमखास भेडसावणारी समस्या म्हणजे वाळवी. जेथे ओलावा येतो किंवा भरपूर आर्द्रता असते, अशा ठिकाणी वाळवीचा धोका असतो. यासाठी पेस्ट कंट्रोल करणे हा उत्तम उपाय ठरू शकतो.