शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हेट स्टोरी २ मुळे बलात्काराच्या घटना वाढतील - दत्ता

By admin | Updated: July 22, 2014 15:22 IST

हेट स्टोरी २ या चित्रपटामुळे लगेच प्रभावीत होणा-या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होईल व त्यामुळे महिलांवर अत्याचार व बलात्कारासारख्या घटना वाढू शकतील अशी भिती कर्नाटक विधानसभेत व्यक्त केली गेली.

 

ऑनलाइन टीम
बंगळुरु, दि. २२ - बोल्ड दृष्यांमुळे चर्चेत असलेल्या हेट स्टोरी २ या चित्रपटामुळे लगेच प्रभावीत होणा-या व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होईल व त्यामुळे महिलांवर अत्याचार व बलात्कारासारख्या घटना वाढू शकतील अशी भिती कर्नाटक विधानसभेत व्यक्त केली गेली आहे. या चित्रपटावर कर्नाटकमध्ये बंदी घालावी अशी मागणीच एका आमदाराने केल्याने पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 
सध्या कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु असून सोमवारी विधानसभेच्या अधिवेशनात हेट स्टोरी २ या चित्रपटाचा विषय उपस्थित झाला. जनता दल सेक्यूलरचे आमदार वायएसव्ही दत्ता यांनी हेट स्टोरी २ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कर्नाटकमध्ये बंदी घालण्याचा विषय विधानसभेत उपस्थित केला. या चित्रपटातील काही सीन्स ऐवढे बोल्ड आहेत की त्यामुळे मनावर प्रभाव पडू शकतो व त्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. दत्ता यांनी मांडलेल्या विषयावर कर्नाटकचे गृहराज्य मंत्री के.जे.जॉर्ज यांनी उत्तर दिले. जॉर्ज म्हणाले, पोलिस आयुक्तांना या चित्रपटातील बोल्‍ड सीन्स तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या अहवालानुसार आता पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे जॉर्ज यांनी सांगितले. 
हेट स्टोरी २ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच वादाच्या भोव-यात सापडला होता. सेंसर बोर्डाने टीव्हीवर दाखवल्या जाणा-या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधील बोल्ड सीन्सवर आक्षेप घेतला होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी सेंसर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आता सेंसर बोर्डनंतर पोलिसांनीही चित्रपटाला कात्री लावल्यास सिनेसृष्टीत नवा वाद निर्माण होऊ शकतो.