शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर पाऊस!

By admin | Updated: May 11, 2015 02:07 IST

फेसबूक, व्हॉट्सअप आणि टिष्ट्वटरवर ‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा पाऊस पडला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिलसिला रविवारी उशिरापर्यंत सुरूच होता.

मुंबई : फेसबूक, व्हॉट्सअप आणि टिष्ट्वटरवर ‘मदर्स डे’च्या शुभेच्छांचा पाऊस पडला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिलसिला रविवारी उशिरापर्यंत सुरूच होता. यादरम्यान, फेसबूक आणि टिष्ट्वटरवर आपल्या आईसोबतचे फोटोज् अपलोड करून अनेकांनी आईप्रति भावना मांडल्या. तसेच, व्हॉट्सअपवर ‘लव्ह यू आई’ म्हणत अनेकांनी आपले स्टेट्स आणि डीपी अपडेट्स केले. त्यामुळे सगळीकडेच ‘व्हर्च्युअल’ मदर्स डे दणक्यात साजरा झाला.संपूर्ण जगभरात ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने गुगलनेदेखील एक खास अ‍ॅनिमेटेड डुडल बनवले आहे. यात प्राण्यांपासून ते माणसांपर्यंतच्या आई-मुलाचे प्रेम दाखवले आहे. डुडलमध्ये गुगलच्या दुसऱ्या ‘ड’ या ‘ओ’ अक्षरातून एक बदक तयार होते आणि ते आपल्या पिल्लाला पंखात सामावून घेते. त्यानंतर जंगली प्राणी, ससा असा प्रवास करीत शेवटी एक लहान मूल पळत आपल्या आईकडे येते. गुगलच्या या काही सेकंदांच्या डुडलमधूनही आई-मुलाचे निखळ नाते हळुवारपणे उलगडले आहे.दरम्यान, बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही आपला आईसोबतचा फोटो अपलोड करून तिच्यासोबतीतील आठवणींना उजाळा दिला. शिवाय, टिष्ट्वटरवर ‘हॅप्पी मदर्स डे’, ‘मॉम्स क्नोव्ह बेस्ट’ असे वेगवेगळे ट्रेंड्सही दिसून आले. (प्रतिनिधी)