शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या वडिलांना पाहण्यासाठी आला अन् जेलमध्ये गेला

By admin | Updated: May 28, 2014 12:53 IST

औरंगाबाद : दवाखान्यात दाखल असलेल्या आजारी वडिलांना पाहण्यासाठी येण्याचा मैत्रिणीचा आग्रह त्याला अस्वस्थ करत होता

औरंगाबाद : दवाखान्यात दाखल असलेल्या आजारी वडिलांना पाहण्यासाठी येण्याचा मैत्रिणीचा आग्रह त्याला अस्वस्थ करत होता. बहीण, भाची, लहान भाऊ असा गोतावळा घेऊन तो जीपने दवाखान्यात गेला. दवाखान्यात मित्रासोबत आलेला लवाजमा पाहून मैत्रिणीचे डोके फिरले अन् तिने आरडाओरड करीत त्याच्यावर छेडछाड करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्याला पकडले अन् कोठडीत डांबले. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आज हेडगेवार हॉस्पिटलमध्ये घडली. शहरापासून जवळ असलेल्या एका तालुक्याच्या ठिकाणची सज्ञान तरुणी काही दिवसांपूर्वी नेवासे येथे शिक्षणासाठी गेली होती. तेथे वर्गमित्र रेहान दादाभाई पठाण (२६) या तरुणासोबत तिची मैत्री जुळली. रोज एकमेकाला भेटणे, मोबाईलवर सतत बो लत राहणे, एसएमएस करणे हे प्रकार सुरू झाले. दोघांनी लग्न करण्याची शपथ घेतली होती. तिचे शिक्षण संपले आणि ती परत येथे आली. तिचे वडील आजारी पडले. त्यांना हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रेहान व त्याच्या मैत्रिणीचे मोबाईलवर रोज संभाषण सुरू होते. तो आज आपली मोठी बहीण, मोठी भाची, दोन भाऊ असा गोतावळा जीपमध्ये घेऊन येथे आला. दवाखान्यात रेहान हा नातेवाईकांसोबत आल्याचे पाहून तिचे डोके फिरले. ती रेहानला घेऊन दवाखान्याबाहेर आली. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली आणि तिने आरडाओरड करत लोकांना जमा केले. त्याच्यावर छेडछाड आणि विनयभंगाचे आरोप केले. जवाहरनगर ठाण्याचे पोलीसही तात्काळ तेथे आले. त्यांनी रेहानला पकडून ठाण्यात नेऊन कोठडीत बंद केले.