शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड संघाला ‘भुता’ने पछाडले ?

By admin | Updated: July 21, 2014 13:39 IST

इंग्लंड क्रिकेट संघाला ‘आॅन फिल्ड आणि आॅफ फिल्ड’ भुताने झपाटले आहे. फिल्डवर त्यांच्या कामगिरीवर या भुताने परिणाम केल्याचा दावा स्पोटर्समेल वेबसाईटने केला आहे

लंडन : इंग्लंड क्रिकेट संघाला ‘आॅन फिल्ड आणि आॅफ फिल्ड’ भुताने झपाटले आहे. फिल्डवर त्यांच्या कामगिरीवर या भुताने परिणाम केल्याचा दावा स्पोटर्समेल वेबसाईटने केला आहे. इंग्लंडचे खेळाडू लँघम हॉटेलमध्ये राहिले होते आणि तिथेच या चर्चा रंगल्या आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक या इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंना याचा प्रत्यय आल्याचेही सांगण्यात आले.भुताच्या भीतीने काही खेळाडूंनी वारंवार रूम बदलल्या आहेत. काही खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसीदेखील तिथे राहण्यास तयार नाहीत. त्यामुळे खेळाडूंची भीतीने झोप उडाली आहे आणि त्याचाच परिणाम श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्यांच्या कामगिरीवर झाल्याची चर्चा आहे.श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीदरम्यान ब्रॉडने रूम बदलली. रूममध्ये अचानक इतके उकडत होते की, मला झोपच लागत नसे. बाथरुममधील नळ अचानक सुरू होत असत. दिवे लावले तर ते आपोआप बंद होत. पुन्हा दिवे बंद केल्यावर तोच प्रकार होत असे. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, असे ब्रॉडने सांगितले. ब्रॉडची गर्लफ्रेंड बॅली म्हणाली, तो सर्व प्रकार धक्कादायक होता आणि म्हणूनच मी लगेच रूम बदलण्यास सांगितले. मोईन अली याच्या पत्नीलाही असाच अनुभव आल्यामुळेच तिने येथे राहण्यासच नकार दिला. बेन स्टोक हाही याच हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत होता आणि त्यानेही अशाच विचित्र घटनांमुळे रूम बदलली होती.१८६५ साली वेल्सच्या राजाने लँघम हॉटेल उभारले. अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा या हॉटेलच्या उभारणीत हातभार असल्याने कमी कालावधीत त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र, आता या हॉटेलबाबत भुताच्या गोष्टींनी प्रसिद्धी मिळविली आहे. हॉटेलच्या कॉरिडोर आणि रूममध्येही भूत असल्याच्या चर्चा रंगल्या. येथे मधुचंद्रासाठी आलेल्या जर्मन डॉक्टरने त्याच्या पत्नीची हत्या करून आत्महत्या केली होती. तसेच एका सैनिकाने येथील रूमच्या बाल्कनीमधून उडी घेऊन आत्महत्या केली होती, या जुन्या घटनाही आता नव्याने चर्चिल्या जात आहेत.