शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांसाठी आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण

By admin | Updated: June 30, 2014 12:50 IST

५० हजार रूपयांकरिता मित्राच्याच आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर अधिक रकमेची दोन दिवसांपासून मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्या जोडप्याला राष्ट्रीय स्वयंसेवक

संघ स्वयंसेवकांनी पकडले अपहरणकर्ते जोडपे : धामणगाव रेल्वे स्थानकावरील घटनाधामणगाव रेल्वे : ५० हजार रूपयांकरिता मित्राच्याच आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर अधिक रकमेची दोन दिवसांपासून मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्या जोडप्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी रेल्वे प्रवासादरम्यान पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले़अतुल आनंद काटे व त्याची पत्नी विशाखा, असे अटकेतील जोडप्याची नावे आहेत. नागपूर येथील मानेवाडा भागात राहणारे मनोज वैरागडे यांची आठ महिन्यांची चिमुकली परी ही घरी खेळत होती.गुरूवारी दुपारी ३ वाजता याच भागात भाड्याने खोली करून राहणारा मनोजचा मित्र अतुल आनंद काटे व विशाखा या जोडप्याने मुलीला आम्ही खेळाला नेत असल्याचा बहाणा करुन सोबत नेले. दोन तासानंतरही परत न आल्याने आपल्या चिमुकलीचे मित्रानेच अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. मनोज यांनी शुक्रवारी नागपूरच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. अपहरण झालेली चिमुकली परी व अपहरणकर्त्या जोडप्यांचा शोध पोलीस घेत होते. शुक्रवारी दुपारी अपहरणकर्त्या अतुल व त्याची पत्नी विशाखाचा फोन मनोजला आला. तुमच्या मुलीचे अपहरण केले असून मुलगी हवी असल्यास पन्नास हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा करण्याची धमकी देण्यात आली. मनोजने त्वरित तीस हजार रूपये अपहरणकर्त्या जोडप्याच्या नागपूर येथील युनियन बँकेच्या खात्यात जमा केले़ धामणगाव शहरात विदर्भस्तरीय तीन दिवसीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांतीय बैठक सुरू आहे़ नगर कार्यवाह गोपाल विजयप्रकाश भैया यांना नागपूर येथील त्यांचे मेहुणे नरेंद्र गांधी यांचा फोन आला. ते अपहरणकर्ते जोडपे रविवारी अकोला येथून नागपूरला गोंडवाना एक्सपे्रसने जात असल्याचे अर्ध्या तासापूर्वी सांगितले़ क्षणाचाही विलंब न लावता गोपाल भैया यांनी दीडशे स्वयंसेवकांसह धामणगाव रेल्वे स्टेशन गाठले. ही प्रवासी गाडी रेल्वे स्टेशनवर येताच स्वयंसेवकांनी ती तपासली. बोगी क्रमांक एस-७ मध्ये अपहरणकर्ते जोडपे मुलीला घेऊन बसले होते. या स्वयंसेवकांनी मुलीला आपल्याजवळ घेऊन त्वरित अपहरणकर्त्या जोडप्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले़ (तालुका प्रतिनिधी)