शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नव्या आंध्रचे मुख्यमंत्री

By admin | Updated: June 9, 2014 03:38 IST

तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनर्रचित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून रविवारी नागार्जुनगर येथील एका सोहळ्यात शपथ घेतली.

विजयवाडा : तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुनर्रचित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून रविवारी नागार्जुनगर येथील एका सोहळ्यात शपथ घेतली. राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहम यांनी चंद्राबाबू नायडू यांना सायंकाळी ७.२७ वाजताच्या शुभमुहूर्तावर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. नायडू यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात तेलगू भाषेत शपथ घेतली. याप्रसंगी १९ कॅबिनेट मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. नायडूंनी तेलगू ताल्ली यांच्या पुतळ्याला दंडवत घातला. आचार्य नागार्जुन विद्यापीठाच्या समोरील ७० एकराच्या खुल्या जागेत हा सोहळा पार पडला. प्रचंड उकाडा असताना देखील या अभूतपूर्व सोहळ्याला लाखो जनतेने हजेरी लावली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, एम. वेंकय्या नायडू, अनंतकुमार, कलराज मित्र, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन कार्यक्रमाला उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. झेलिंग आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच इतर नेते उपस्थित होते. (वृत्तसंस्था)