शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवूडकरांची ‘गॅलक्सी’च्या दारी धाव !

By admin | Updated: May 8, 2015 05:49 IST

गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले; पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही.

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी व अभिनेत्रींनी सलमानची भेट घेण्यासाठी त्याचे गॅलक्सी अपार्टमेंट्स गाठले. सलमानला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कुटुंबीयांसह सर्व बॉलिवूडलासुद्धा धक्का बसला आहे. त्यामुळे सलमानला दिलासा देण्यासाठी बॉलीवूडच्या स्टार्सची रीघ लागली आहे.गुरुवारी सकाळी सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले; पण घरातील दुसरा एकही सदस्य घराबाहेर दिसला नाही. बुधवारी रात्री सलमान जेव्हा दिवसभर कोर्टात राहून जामीनावर घरी परतला होता, तेव्हापासून चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केलेली दिसून आली. सलमानने खास सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी सकाळपासून खासगी बाऊन्सर गॅलक्सी आवारात तैनात केले होते. शिवाय, दिवसभर सलमानचे कुटुंबीय त्याच्यासोबतीला घरीच असलेले दिसून आले. सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्याचे कळताच बॉलिवूड सेलेब्सनी सलमानच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी गर्दी केली. अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेत्री प्रीती झिंटा, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, निर्माता रितेश सिधवानी, अभिनेता सोनू सुद, अभिनेता करिश्मा कपूर, अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेता चंकी पांडे, अभिनेत्री बिपाशा बसू, भाजपा प्रवक्त्या शायना एनसी, माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि टीव्ही अभिनेता संतोष शुक्लासह अनेक सेलिब्रिटी सलमानला भेटण्यासाठी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. परंतु, सलमानची एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या कतरिना कैफने मात्र सलमानविषयी काहीच माहिती करून घेतली नसल्याचे कळते आहे. (प्रतिनिधी)> भाजपा खासदार हेमा मालिनी, राज बब्बर, सुप्रियो बाबूल, मनोज तिवारी अशा बॉलिवूडच्या अनेक आजी-माजी कलाकारांनी बुधवारपासून सलमानची तळी उचलून धरली आहे. त्याला कमीतकमी शिक्षा व्हावी याकरिता प्रार्थना करीत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. असे असतानाही राज व राणे यांनी सलमानची भेट घेतल्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उभयतांवर तोंडसुख घेतले. सलमानला न्यायालयाने दोषी ठरवल्यावर या दोघांनी त्याची भेट घ्यायला नको होती, अशी टिष्ट्वटरद्वारे प्रतिक्रिया दिली. भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, कायद्याचा मान राखण्यासाठी ज्याने प्रामाणिकपणे कर्तव्यपूर्ती केली त्या पोलिसाच्या कुुटुंबीयांना भेटायला हे गेले नाहीत. त्यांना सामान्य माणसाशी काही देणेघेणे नाही. त्यावर भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेकडे भांडारी यांचे लक्ष वेधले असता भाजपाच्या वतीने कुणी अशी भूमिका घेतली असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याची सारवासारव केली.