शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोगीतील शौचालयात सापडला ९० किलो गांजा

By admin | Updated: June 24, 2014 09:10 IST

रेल्वेगाडीतील शौचालयात तस्करीच्या माध्यमातून नेत असलेला ९० किलो गांजा सोमवारी रेल्वे पोलिसांनी जप्त केला. गांजा तस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही.

तस्करीचा प्रयत्न फसला : ओखा-पुरी एक्स्प्रेसची घटना नागपूर : रेल्वेगाडीतील शौचालयात तस्करीच्या माध्यमातून नेत असलेला ९० किलो गांजा सोमवारी रेल्वे पोलिसांनी जप्त केला. गांजा तस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे आरपीएफच्या विशेष अन्वेषण शाखेच्या निरीक्षकांच्या बैठकीत महानिरीक्षक ए. के. सिंह यांनी रेल्वेद्वारा तस्करीचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष देखरेख चमू तैनात करण्याची ताकीद दिली होती. त्या आधारावर रेल्वेच्या विशेष शाखेने आपल्या खबरींना कामावर लावले आहे. यापैकीच एका खबरीने सोमवारी रेल्वे क्रमांक १८४०१ ओखा-पुरी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीने गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. निरीक्षक सिंह यांनी तातडीने याची माहिती बल्लारशहा आरपीएफला दिली. तेथील आरपीएफ अधिकारी रामबीर सिंह यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आलेल्या ओखा-पुरी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीची तपासणी केली. तेव्हा बोगीतील शौचालयामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा असलेला आढळून आला. अशा पाच पिशव्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येक पिशवीत ४६ पॅकेट होते. दोन किलो वजनाचे एक पॅकेट होते. याबाबत तातडीने वर्धेतील रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. वर्धा जीआरपीचे निरीक्षक नालट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)