शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ६२ टक्के पालक मुलांना मारतात

By admin | Updated: February 8, 2015 17:48 IST

मुंबईतील ६२ टक्के पालक त्यांच्या मुलांना मारहाण करतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ - मुंबईतील ६२ टक्के पालक त्यांच्या मुलांना मारहाण करतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुसंख्य पालक मुलांना मारत असून २ ते ८ वर्ष या वयोगटातील मुलांना पालकांकडून सर्वाधिक मार खावा लागतो असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. 
मुंबईतील एका संस्थेने नुकतेच सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात मुंबईतील १७०० पालकांची मतं जाणून घेण्यात आली. यापैकी ६२ टक्के पालकांनी त्यांच्या मुलाला मारल्याचे कबुल केले.  मुलांना मारण्यात वडिलांपेक्षा आई आघाडीवर असते असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. २९ टक्के वडिलांनी मुलांना मारल्याचे मान्य केले. तर ६१ टक्के मातांनी मुलांना मारल्याचे सांगितले. मुलं नियंत्रणात नसल्याने त्यांच्यावर हात उगारावा लागतो असे या पालकांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या पालकांनी स्वतःदेखील लहान असताना आईवडिलांकडून मार खाल्ला आहे. 'जर एखाद्याला लहानपणी त्याच्या आईवडिलांनी मारले असेल तर तो व्यक्तीदेखील पालक झाल्यावर त्याच्या मुलावर मुलावर हात उगारतो'' असे निरीक्षणही मानसोपचार नोंदवले आहे.  याच संस्थेने दोन वर्षांपूर्वीही यासंदर्भात सर्वेक्षण केले होते. यानुसार २०१२ मध्ये मुलांना मारहाण करणा-या पालकांचे प्रमाण ६९ टक्के ऐवढे होते. २०१२ च्या तुलनेत यंदा मुलांना मारणा-या पालकांची संख्या सात टक्क्यांनी घटली आहे. 
सर्वेक्षणानुसार सर्वाधिक २ ते ८ या वयोगटातील मुलं त्यांच्या आईवडिलांकडून मार खातात. तर ८ ते १० वर्ष या वयोगटातील मुलांना पॉकेट मनी बंद करु किंवा बोर्डींग शाळेत पाठवू अशी धमकी जास्त दिली जाते अशी माहिती समोर आली आहे.