शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलपेठेतील तरुण ठार

By admin | Updated: January 10, 2017 00:06 IST

काका गंभीर : लग्नाची बोलणी करुन परत येत असताना अपघात

जळगाव : मुंबई येथे बहिणीच्या लगAाची बोलणी करुन घरी परत येत असताना कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात केतन हिरामण काळे (वय 28 रा.विठ्ठल पेठ, बुनकरवाडा, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा काका सोपान आनंदा काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ठाणे व डोंबिवलीच्या दरम्यान हा अपघात झाला.जुन्या जळगाव परिसरात राहणारा केतन याचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे तर वडील व काका हे शेती करतात. लहान बहिण नैना हिच्या लगAाचे स्थळ मुंबईत निश्चित झाले होते. त्याबाबत केतन व काका सोपान काळे हे बोलणी करण्यासाठी शनिवारी एका कारने मुंबईत गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर रविवारी रात्रीच ते निघाले. ठाणे ते              डोंबिवली या दरम्यान महामार्गावर उड्डानपुलाजवळ रात्री समोरुन येणा:या वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या खाली कोसळली. यात केतन जागीच गतप्राण झाला तर काका सोपान काळे               गंभीर झाले. त्यांच्यावर मुंबईतील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.जळगावात झाले अंत्यसंस्कारअपघातात ठार झाल्यानंतर शवविच्छेदन व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन केतनचा मृतदेह संध्याकाळी जळगावात आणण्यात आला. सात वाजता त्याच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. केतन याचा स्वभाव प्रेमळ व मनमिळावू असल्याने अंत्यसंस्काराच्यावेळी अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.दोन बहिणींचा                एकुलता एक भाऊकेतन हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. मोठी बहिण गितांजली ही विवाहित आहे तर लहान नैना हिच्या लगAाची यंदा तयारी सुरु होती.वडील हिरामन आनंदा काळे हे शेती करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिणी, मेहुणा, काका व आजोबा असा परिवार आहे. केतन हा अविवाहित होता. केतन हा मनमिळावू स्वभावासाठी परिसरात परिचित होता. परिसरातील चांगल्या कामांमध्ये तो सक्रिय सहभाग घ्यायचा. काका सोपान काळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.