शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचा एकमेकांवर हल्ला

By admin | Updated: January 1, 2016 00:15 IST

क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून दोन गटातील तरुणांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला.

धुळे : क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून दोन गटातील तरुणांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना 30 डिसेंबरला रात्री 10.30 वाजेच्या सुमारास साक्री शहरातील सिडी शॉपसमोर घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीनुसार एकूण पाच जणांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यरात्रीनंतर दोन संशयितांना अटक केली आहे.

या घटनेबाबत पहिली फिर्याद अतुल सुकदेव जाधव (31, रा.रामजीनगर, साक्री) याने दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी साजीद अहमद तांबोळी, इम्रान अहमद तांबोळी व अन्य एक जण (नाव, गाव माहिती नाही) (रा.वंजारगल्ली, साक्री) यांनी फिर्यादी अतुल जाधव याला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. मारहाणीत साजीद तांबोळी याने अतुल जाधवच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. म्हणून त्याला गंभीर दुखापत झाली. कोल्ड्रिंक मागण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मध्यरात्रीनंतर 1.15 वाजता संशयित साजीद तांबोळी व इम्रान तांबोळी या दोघांना अटक केली.

दुस:या गटाकडूनही फिर्याद

याच घटनेप्रकरणी दुस:या गटाकडून साजीद अहमद तांबोळी (31, रा.वंजारगल्ली, साक्री) याने फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अतुल सुकदेव जाधव (रा.रामजीनगर, साक्री), संदीप सीताराम मासुळे (रा.वंजारगल्ली, साक्री) या दोघांनी फिर्यादी साजीद तांबोळी व त्याचा भाऊ इम्रान तांबोळी याला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. साजीद तांबोळी हा दुकानासमोर उभा असताना दोघेही संशयित त्याच्याजवळ आले. त्यांनी दारूची बाटली फोडून त्याला घरी जाण्यास सांगितले. त्यावर साजीदने काय झाले? अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग आल्याने अतुल जाधवने साजीदला मारण्यासाठी बाक उचलला. बाक डोक्याला लागल्याने त्याला दुखापत झाली. तर संदीप मासुळे याने इम्रान तांबोळीला दगड मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून वरील दोघांवर भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एच.एस. बैरागी करीत आहेत.