शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तरुण वळले शेळीपालनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 18:06 IST

उत्पन्न खर्चही निघू शकत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.

महेंद्र रामोशे / ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर उत्पन्न जास्त आले तर बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पन्न खर्चही निघू शकत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.  या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतक:यांनी शेळीपालन हा पूरक व्यवसाय सुरू केला आहे.  ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण शेळीपालनाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे आज अमळनेर तालुक्यात तब्बल 23 गावांमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय जोमात सुरू झालेला आहे. शेळीला गरिबांचे धन म्हटले जाते. आजही ग्रामीण भागात शेळी पाळणे हा व्यवसाय आर्थिक दुर्बल घटकापुरताच मर्यादित आहे. मात्र शेळीपालनातून होणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही.बी. भोई आणि डॉ .एस. वाय. पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ग्रामीण भागात शेळीला आवश्यक असणारा चारा ब:यापैकी उपलब्ध आहे. त्यामुळे काही भागात अर्ध बंदिस्त तर काहींनी पूर्ण बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. ज्या भागात चारा उपलब्ध नाही ते बाहेरून चारा विकत आणून शेळी पाळत आहेत. मात्र पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने शासकीय दराने चारा उपलब्ध करून दिल्यास निश्चितच आणखी काही तरुण या व्यवसायाकडे वळू शकतील असे मत तरूणांनी व्यक्त केल़े तालुका पशुवैद्यकीय डॉ. व्ही.बी. भोई आणि डॉ. एस. वाय. पाटील यांनी व्हॉट्स अपचा ग्रुप बनवला आहे. त्यावर शेळी पालनाबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच वेळोवेळी लसीकरण आणि औषधी कशा पद्धतीने द्याव्यात याचीही माहिती ग्रुपद्वारे दिली जाते.शेळी विकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्रपणे बाजार नाही. बाजार समितीने पुढाकार घेऊन स्वतंत्र शेळी बाजार भरवला पाहिजे, व भावदेखील ठरवून दिला पाहिजे, ज्यामुळे  शेळी पालन करणा:या  व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही.शेळीपालन करणारे व्यावसायिक महेंद्र रामोशे आणि विनोद खैरनार (गंगापुरी), जालिंदर चौधरी व मच्छिंद्र चौधरी (गांधली), कपिल चौहान व अक्षय चौहान, अजापुत्र गोट फार्म, प्रदीप महाजन, महेश पाटील, लक्ष्मीकांत पाटील (सर्व अमळनेर), रामराव पाटील (जुनोने), गणेश पाटील (फाफोरे)े, अरुण पाटील, सतीलाल परदेशी, ज्ञानेश्वर पाटील (सर्व रंजाने), शिवा चौधरी (पळासदळे), दत्तात्रय बाविस्कर (रामेश्वर), गोरख चौधरी (गांधली),  अमोल राणे (दहिवद), संजय पाटील (जैतपीर), महेंद्र बोरसे, विलास पाटील, अनिल शिसोदे (डांगरी), विजय पाटील (रामेश्वर), दिनेश पाटील (खेडी),  रमण भदाणे (मंगरूळ) यांचा समावेश आहे. शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन केल्यास मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे शेतक:यांनी  या व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यांना पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.- डॉ. व्ही.बी. भोई, पशुवैद्यकीय अधिकारी, अमळनेर