शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलाव परिसरात तरुणाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

जळगाव : तांबापुरातील गौतम नगरातील रहिवासी गणेश रामदास अहिरे (वय ४०) या तरुणाने मेहरुण तलाव परिसरात कडूलिंबाच्या झाडाला दोरीने ...

जळगाव : तांबापुरातील गौतम नगरातील रहिवासी गणेश रामदास अहिरे (वय ४०) या तरुणाने मेहरुण तलाव परिसरात कडूलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. गणेश यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही, मात्र मयताचे पाय जमिनीला टेकले जात असल्याने या घटनेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश अहिरे खासगी वाहनावर चालक म्हणून कामाला होते. शनिवारी रामदेववाडी (ता.जळगाव) येथे पैसे घ्यायला जायचे आहे, असे सांगून ते दुपारी शालकाकडून गेले. सायंकाळी पाच वाजता गणेश यांचे गळफास घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शालक प्रवीण चंद्रकांत वाघ याच्याही मोबाईलच्या व्हाटसॲप गृपवर हे फोटो आल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनील सोनार व शुध्दोधन ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेश यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषीत केले.

दुपारी शालकसोबत गप्पा

गणेश हे दुपारी शालक प्रवीण वाघ याच्या घरी गेले होते. तेथे दोघं व इतर गप्पांमध्ये रंगल्या होत्या. हसतखेळत वातावरणात त्यांनी दीड वाजता घरातून पाय काढला. रामदेववाडी येथे पैसे घ्यायला जायचे आहे असे त्यांनी सांगितले. सायंकाळी मृतदेहच आढळला. अवघ्या तीन ते चार तासात असं नेमकं काय घडले की, गणेशला आत्महत्या करावी लागली. मयताचे पाय जमिनीला टेकलेले होते, त्यामुळे खरच आत्महत्या आहे की घातपात याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी झाडाखाली दारुची बाटली, आगपेटी व चप्पल आढळून आली. खिशात मोबाईल, पाकीट व चाव्या होत्या. गणेश नेमका कशाने रामदेववाडी गेला, की गेलाच नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही.मात्र पोलीस कारणाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंगला व मुलगा चेतन असा परिवार आहे.