पिंपळगाव हरे., ता.पाचोरा : निंभोरी- मोंढाळा रस्त्यावर मोंढाळे गावाजवळ 12 रोजी मध्यरात्रीनंतर झालेल्या मोटारसायकल अपघातात संदीप सुरेश जगताप (वय 36, रा.बाहेरपुरा, पाचोरा) याचा मृत्यू झाला. पोलीस सूत्रानुसार, अपघातग्रस्त मोटारसायकलसह (एमएच 19-सीके 6837) पहाटे संदीप हा रक्तबंबाळ अवस्थेत मयत स्थितीत आढळला. संदीप हा त्याचा मित्र कैलास बागुल याच्यासोबत मोंढाळे येथे भोजनासाठी आला होता असे समजते. या अपघातात कैलास बागुल हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ जळगावला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरे. पो.स्टे.ला गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. डीवायएसपी केशव पातोंड यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास हे.कॉ. हरी पवार व मंडलिक करीत आहेत. (वार्ताहर)
पाचोरा येथील तरुण अपघातात ठार
By admin | Updated: April 14, 2017 00:34 IST