अमळनेर : चारा आणायला शेतात गेलेल्या तालुक्यातील निम येथील राजू वामन कोळी या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आली. वादळाने झाडाची फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून महसूल विभागाने वरिष्ठांकडे प्राथमिक अहवाल पाठवला आहेतो सकाळी ६ च्या ा सुमारास चारा घ्यायला शेतात गेला होता. तो शेतात बांधावर मारून पडलेला दिसला. तलाठी गौरव शिरसाठ व गावकऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
झाड पडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:15 IST