शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बस कुठे अडकली आधीच कळणार, मात्र ॲप लॉचिंगच लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

सचिन देव जळगाव : रेल्वे गाड्यांप्रमाणे प्रवाशांना एसटी बसचेही घर बसल्या लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी एसटी महामंडळाने व्हीटीएस (व्हेईकल ...

सचिन देव

जळगाव : रेल्वे गाड्यांप्रमाणे प्रवाशांना एसटी बसचेही घर बसल्या लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी एसटी महामंडळाने व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) प्रणाली अंमलात आणली आहे. यामुळे प्रवाशांना आगारात निघालेली बस सध्या कुठे आहे, संबंधित गावाला ही बस किती वाजता पोहचेल, आधी माहिती प्रवाशांना व्हीटीएस प्रणालीमुळे तत्काळ समजणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून महामंडळातर्फे राज्यातील प्रत्येक आगारात या प्रणालीचे काम सुरू आहे. यंदा १५ ऑगस्टला राज्यभरात व्हीटीएस नावाच्या मोबाइल ॲपद्वारे ही सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार होती. मात्र, अद्यापही याप्रणालीचे तांत्रिक काम अपूर्ण असल्यामुळे १५ ऑगस्टचा मुहूर्तही हुकला आहे.

इन्फो :

बस कुठे आहे हे आधीच कळणार

`व्हीटीएस` सिस्टीमद्वारे आगारातून निघालेली बस ताशी किती वेगाने धावते आहे, सध्या ती कुठल्या थांब्यावर आहे, पुढच्या थांब्यावर ती केव्हा पोहचेल ही माहिती प्रवाशांना `व्हीटीएस`ॲपद्वारे कळणार आहे. याप्रणालीसाठी जळगाव आगारात ठिकठिकाणी स्क्रिन लावण्यात आले असून, जिल्ह्यातील ७३७ बसेसला `व्हीटीएस` सिस्टीम लावण्यात आली आहे.

इन्फो :

किती बसेसला बसविली यंत्रणा

जळगाव : ११७

यावल : ६१

चाळीसगाव : ७६

मुक्ताईनगर : ४७

भुसावळ : ४५

रावेर : ५६

चोपडा : ७७

एरंडोल : ५४

अमळनेर : ७१

पाचोरा : ५५

जामनेर : ७८

एकूण : ७३७

इन्फो :

१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला

-एसटी महामंडळातर्फे गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील आगारांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमचे कामकाज सुरू आहे. यंदा स्वातंत्र्य दिनापासून राज्यात एकाचवेळी ही सिस्टीम सुरू करण्यात येणार होती. मात्र, इतर तांत्रिक कामे अपूर्ण असल्यामुळे १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे.

- सध्या राज्यभरात व्हीटीएस प्रणालीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या महिनाभरात उर्वरित तांत्रिक कामेही पूर्ण होऊन, ही सिस्टीम सुरू होणार असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात येत आहे.

- महामंडळातर्फे राज्यभरात एकाचवेळी ही सिस्टीम सुरू करण्याचे नियोजन आहे. काही आगारांमध्ये सिस्टीमचे काम अपूर्ण असल्यामुळे, ही प्रणाली सुरू होण्यास विलंब होत असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

`व्हीटीएस`प्रणालीचे काम जळगाव विभागात १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, या प्रणालीचे महामंडळाकडून ॲप विकसित न करण्यात आल्यामुळे याप्रणालीच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. जसे महामंडळाकडून ॲप विकसित होईल, तशी ही प्रणाली सुरू करण्यात येईल.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग