शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

- स्टार : 723 लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने दहावीची परीक्षा ...

- स्टार : 723

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ५८ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा शुल्कापोटी सुमारे २ कोटी ४२ लाख ०१ हजार ५५५ रुपये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे रक्कम जमा झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या शिक्षण मंडळाच्या निर्णयाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या परीक्षेसाठी डिसेंबरपासून पुढे दोन महिने अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी नियमित, विलंब आणि अतिविलंब शुल्क, अशी मुदत होती. परीक्षा शुल्क हे प्रति विद्यार्थी ४१५ रुपये होते. परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा जाहीर केले. पण, कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही. दुसरीकडे बाधितांसह मृत्यूचे प्रमाणही वाढले. परिणामी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळानेदेखील निर्णय घेत दहावीची परीक्षा रद्द केली. ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना हे शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय शासनाकडून झालेला नाही.

------------------------------------

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा : ७८४

दहावीतील एकूण विद्यार्थी : ५८,३१७

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क : ४१५

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम : २,४२,०१,५५५

----------------------------------

पुढे काय होणार, विद्यार्थी संभ्रमात

परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. पण, पुढील प्रवेशप्रक्रिया कशी राबविणार याबाबत अजूनही शासनाने निर्णय घेतलेला नाही. हे शिक्षण विभागाने स्पष्ट करून आमचा संभ्रम दूर करावा.

- नेहा चंदेले, विद्यार्थिनी

--------------

दहावीचे अंतर्गत मूल्यमापन लवकर करावे. तसेच शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्क परतीचा निर्णय सुद्धा लवकर घ्यावा. अकरावी प्रवेशासाठी कुठली प्रक्रिया राबविणार आहे. याबाबत माहिती त्यांनी लवकरात लवकर द्यावी.

- आदिती भालेराव, विद्यार्थिनी

------------

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असेल, तर हरकत नाही. सीईटीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम सुद्धा विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी. कोरोनामुळे आधीच सर्वांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे.

- गणेश कोळी, विद्यार्थी

---------------------------

यंदा कमी झाली होती परीक्षार्थींची संख्या

मागील वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, यंदा ५८ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. बारावीसाठी गेल्या वर्षी ५९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा ४९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. दरम्यान, बारावीची परीक्षा होणार की नाही, याबाबत कुठलीही स्पष्टता शासनाकडून करण्‍यात आलेली नाही.